ETV Bharat / entertainment

विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना वडील शाम कौशलनं शेअर केली भावनिक पोस्ट - vicky kushal birthday - VICKY KUSHAL BIRTHDAY

Vicky Kaushal Birthday : अभिनेता विकी कौशलच्या वडीलांनी एक भावनिक पोस्ट केली आहे. याशिवाय त्याच्या भावानं देखील काही फोटो शेअर करून त्याला या खास प्रसंगी शुभेच्छा दिल्या आहेत.

vicky kushal birthday
विकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (sham kaushal Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 16, 2024, 2:51 PM IST

मुंबई - Vicky Kaushal Birthday : बॉलिवूड स्टार विकी कौशल आज 16 मे रोजी 36 वर्षांचा झाला आहे. या निमित्तानं त्याचे चाहते आणि कुटुंबीय त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विकीचा जन्म 1988 मध्ये मुंबईत झाला. त्याचे वडील शाम कौशल हे बॉलिवूडमधील ॲक्शन आणि स्टंट दिग्दर्शक आहेत. लहानपणापासूनच विकी वडिलांबरोबर शूटिंग सेटवर जायचा आणि तिथूनच त्याला अभिनयाची आवड निर्माण झाली. त्याला अभिनेता बनायचे होत, हे त्यानं ठरवलं होतं. दरम्यान विकीला वडील आणि धाकटा भाऊ सनी कौशलनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विकीला त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वडील शाम कौशल यांनी त्याला आशीर्वाद दिला आहे.

शाम कौशल यांनी शेअर केली पोस्ट : शाम कौशल यांना त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं, "बेटा तुझावर खूप प्रेम आणि अभिमान आहे, देवाचे आशीर्वाद सदैव तुझ्याबरोबर राहो, मी खूप धन्य आहे की मला तुझासारखा मुलगा मिळाला. फक्त देवाला माहित होते की 23 वर्षांनी तू 'छावा' या चित्रपटात तलवार सीन करणार आहेस. शाम कौशल यांनी शेअर केला फोटो हा 'अशोका' चित्रपटाच्या सेटवरचा आहे. शाम कौशल यांनी विकीचे तीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोमधील एकामध्ये तो तलवार घेऊन उभा आहे. दुसरीकडे, विकी कौशलचा धाकटा भाऊ आणि अभिनेता सनी कौशलनं त्याच्या मोठ्या भावाचे दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो हा बालपणीचा आहे. याशिवाय दुसरा फोटो हा आताचा आहे.

सनी कौशलनं दिल्या विकी कौशलला वाढदिवसाच्या शुभेच्छा : विकी कौशलला शुभेच्छा देताना सनीनं पोस्टवर लिहिलं, "36 वर्षात फार काही बदलले नाही, हॅपी बर्थडे क्युटी." आता अनेकजण विकीला या खास दिवसाच्या निमित्तनं वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. दरम्यान विकी कौशल सध्या त्याचा आगामी चित्रपट 'छावा' शूटिंगमध्ये व्यग्र आहे. दरम्यान विकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो, 'लव्ह अ‍ॅन्ड वॉर'मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरबरोबर दिसणार आहे. याशिवाय तो 'बॅड न्यूज', 'तख्त' आणि 'लुका चुप्पी 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. भावड्या 36 वर्षातही बदलला नाही : विकी कौशलला वाढदिवसानिमित्त सनीनं दिल्या हटके शुभेच्छा! - Vicky Kaushal Birthday
  2. 'सरफरोश'ची 25 वर्षे : नवाजुद्दीन सिद्दीकीनं शेअर केला आमिर खानबरोबर काम करण्याचा अनुभव - 25 years of Sarfarosh
  3. कियारा अडवाणी आणि ऐश्वर्या राय बच्चन कान फेस्टिव्हलसाठी रवाना - KIARA ADVANI AND AISHWARYA RAI

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.