ETV Bharat / entertainment

'छावा'च्या शूटिंगमध्ये हात फ्रॅक्चरही होऊन विकी कौशलची जिद्द, म्हणाला "थांबू शकत नाही" - विकी कौशल

विकी कौशलच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झालं असूनही जिममध्ये घाम गाळत असताना दिसत आहे. त्यानं हा व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला आहे. अलिकडेच 'छावा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली होती.

Vicky Kaushal
विकी कौशल
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 10:03 AM IST

मुंबई - अभिनेता विकी कौशलला दररोज आपला वेळ व्यायामासाठी देत असतो. शरीर फिट राहण्यासाठी तो पुरेपुर काळजी घेतो. अलिकडे इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये त्यानं पोस्ट केलेला एक व्हिडिओ खूप प्रेरणादायी आहे. अलिकडेच 'छावा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. यामध्ये त्याचा हात फ्रॅक्चर झाला होता. त्याच्या हातावर आता बँडेज करण्यात आलंय. असे असतानाही त्यानं आपल्या वर्कआउटचा वेळ वाया घालवला नाही. जखमी असूनही तो जिममध्ये घाम गाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याचं त्याच्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Vicky Kaushal
विकी कौशल

"जेव्हा आपण धावू शकत नाही तेव्हा आपण चालतो...आपण थांबू शकत नाही", असं कॅप्शन त्यानं आपल्या व्हिडिओला दिलंय. तो छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित 'छावा' या चित्रपटाचं शूटिंग करतोय. ऐतिहासिक विषयावरील या चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत. या चित्रपटात रश्मिका मंदान्नाही भूमिका साकारणार आहे.

रश्मिकाने नुकतेच 'छावा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. शूट संपल्यानंतर तिने दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपटाच्या इतर टीमचे आभार मानले. या चित्रपटात विकी कौशलसह ती पहिल्यांदाच स्क्रिन स्पेस शेअर करत आहे. विकीबद्दल काम करत असतानाचा अनुभव शेअर करताना रश्मिकानं लिहिलंय, "तुझ्यासोबत काम करताना खूप आनंद झाला. तू खूपच प्रेमळ आहेस. मी गंमत करतेय.. तू एक रत्न आहेस. तुझ्यासाठी मी नेहमी शुभेच्छा देईन. खूप आनंद झाला. आईने मला तुला नमस्कार करायला सांगितले आहे."

या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्याबद्दल बोलताना तिने लिहिलंय की, "मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं की एवढ्या मोठ्या सेटवर 1500 लोक काम करत असताना इतक्या शांत आणि संयमानं कसा काय हाताळू शकता. सर तुम्ही मला येसूबाई म्हणून पाहिलंय, खरंतर जगातल्या कोणीही याबद्दल साधा विचारही करु शकले नसते."

विकी कौशलच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलायचं तर तो एका अनटाइटल्ड रोमँटिक ड्रामा चित्रपटात दिसणार आहे. आनंद तिवारी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित या चित्रपटात तृप्ती दिमरी आणि अम्मी व्रिक यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

हेही वाचा -

  1. "हिंमत नही छोडना, बस्स !" आनंद महिंद्रा यांनी सरफराज खानच्या वडिलांना ऑफर केली थार
  2. 'वॉर'मधील कार चेस सीक्वेन्ससाठी बॉडी डबल न वापरल्याबद्दल सिद्धार्थ आनंदने केलं हृतिक आणि टायगरचे कौतुक
  3. 'उडान' फेम अभिनेत्री कविता चौधरीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.