ETV Bharat / entertainment

विकी कौशल सारा अली खान स्टारर 'जरा हटके जरा बचके' लवकरच होणार ओटीटीवर रिलीज - Zara Hatke Zara Bachke - ZARA HATKE ZARA BACHKE

Zara Hatke Zara Bachke OTT Release: विकी कौशल आणि सारा अली खान अभिनीत 'जरा हटके जरा बचके' हा डिजिटल रिलीजसाठी सज्ज आहे. तुम्ही चित्रपट हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता ते जाणून घ्या.

Zara Hatke Zara Bachke OTT Release
जरा हटके जरा बचके ओटीटीवर रिलीज (विक्की सारा(Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 12, 2024, 5:09 PM IST

मुंबई - Zara Hatke Zara Bachke OTT Release: 'जरा हटके जरा बचके' हा 2023 मधील सर्वात आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. विकी कौशल आणि सारा अली खान अभिनीत या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं. जवळपास एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट ओटटीवर प्रीमियर होण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटामध्ये सारा आणि विकी व्यतिरिक्त राकेश बेदी, सुष्मिता मुखर्जी, अतुल तिवारी आणि नीरज सूद आणि इतर काही कलाकार आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2 जून 2023 रिलीज झाला होता. 'जरा हटके जरा बचके' चित्रपट 40 कोटीच्या बजेटमध्ये निर्मित झाला आहे. या चित्रपटानं बॉक्स खूप धमाकेदार कमाई केली.

'या' दिवशी होईल ओटीटीवर प्रसारित : 'जरा हटके जरा बचके' जीओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या बहुप्रतीक्षित डिजिटल रिलीजची घोषणा केली गेली आहे. चित्रपटाचा एक सुंदर ट्रेलर रिलीज करूनओटीटी रिलीजची घोषणा करण्यात आली. इंस्टाग्रामवर चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करताना जीओ सिनेमानं कॅप्शनमध्ये लिहिलं, "सहकुटुंब विवाह केला होता, आता सहकुटुंबासमोर घटस्फोटही होईल! आता सर्वांनी या घटस्फोटात सामील व्हा. 17 मे पासून 'जरा हटके जरा बचके' प्रसारित होईल." दरम्यान या चित्रपटाच्या रिलीजला आता एक वर्ष पूर्ण होत आहे, त्यामुळे हा चित्रपट ओटीटीवर प्रसारित होत आहे.

चित्रपटाची कहाणी ? : लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या कहाणीबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट एका मध्यमवर्गीय विवाहित जोडप्यावर कपिल-सोम्या आधारित आहे. हे नवविवाहित जोडपे संयुक्त कुटुंबात एकत्र राहत असून त्यांना प्रायव्हसी मिळत नसल्यानं दोघेही नाराज होतात. शिवाय त्यांना एक स्वत;चे घर सरकारी योजनेद्वारे पाहिजे असते, त्यामुळे दोघे घटस्फोट घेण्याचे प्रयत्न करतात. या चित्रपटाची कहाणी जरा हटकेच आहे. या चित्रपटात प्रेक्षकांना कॉमेडी ड्रामा या गोष्टी पाहयला मिळेल. आता हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यानं अनेकजण खूश आहेत.

हेही वाचा :

  1. मदर्स डेनिमित्त बॉलिवूड ते साऊथमधील 'या' सेलिब्रिटींनी त्यांच्या आईवर केला प्रेमाचा वर्षाव - Mothers Day 2024
  2. 'पुष्पा' अडचणीत, आमदार मित्राच्या प्रचारासाठी अल्लू अर्जुनवर गुन्हा दाखल - andhra pradesh elections 2024
  3. आईची भूमिका साकारून 'या' अभिनेत्रींनी रुपेरी पडद्यावर केलं राज्य - mothers day 2024 special

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.