ETV Bharat / entertainment

विकी कौशलनं दिली कतरिना कैफबरोबर काम करण्याबद्दल प्रतिक्रिया - vicky kaushal and katrina kaif

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 5:53 PM IST

Vicky Kaushal and Katrina kaif : विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध जोडप्यापैकी एक आहे. आता विकीला 'बॅड न्यूज'च्या प्रमोशनदरम्यान पत्नीबरोबर काम करण्याबद्दल विचारण्यात आलं, तेव्हा त्यानं आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं.

Vicky Kaushal and Katrina kaif
विकी कौशल आणि कतरिना कैफ (विक्की कौशल-कटरीना कैफ (फाईल फोटो) (ANI))

मुंबई - Vicky Kaushal and Katrina kaif : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या त्याचा नवीन चित्रपट 'बॅड न्यूज'च्या यशाचा आनंद घेत आहे. हा चित्रपट 19 जुलै रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं 4 दिवसांत बॉक्स ऑफिसवर 33.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये कमी गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता देखील विकी कौशल 'बॅड न्यूज'चं प्रमोशन करत आहे. अलीकडेच विकी कौशलला पत्नी कतरिनाबरोबर चित्रपट करण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानं एक उत्तर दिलं. आता या गोष्टीमुळे विकी हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विकी आणि कतरिना दिसणार एका चित्रपटात एकत्र ? : विकी आणि कतरिनाला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळावे, अशी अनेक दिवसांपासून चाहत्यांची अपेक्षा आहे. दरम्यान विकी कौशलनं कतरिनाबरोबर काम करण्याबाबत म्हटलं, "मला आशा आहे की मी आणि कतरिना लवकरच एका चित्रपटात दिसणार आहे. आम्ही दोघंही आम्हाला योग्य प्रकारे शोभेल अशा कहाणीच्या शोधात आहोत. आम्हाला असा चित्रपट करायचा नाही जो फक्त आमच्यासाठी बनवला जाईल. कहाणीच्या मागणीनुसार आमची जोडी असावी, तरच मजा येईल. आम्ही वाट पाहत आहोत आणि आम्हाला याची घाई नाही." 'बॅड न्यूज'मधील विकीचा अभिनय अनेकांना आवडत आहे.

'बॅड न्यूज'चं बॉक्स कलेक्शन : विकी कौशलच्या 'बॅड न्यूज'नं पहिल्या वीकेंडमध्ये चांगला व्यवसाय केला. सोमवारी चित्रपटाच्या कलेक्शनचा आलेख घसरला. रिलीजच्या चौथ्या दिवशी, चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 3.5 कोटी रुपयांची कमाई केली. रिलीजच्या तिसऱ्या दिवसापासून सर्वात कमी कलेक्शन चित्रपटानं केलंय. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 8.62 कोटी रुपये, दुसऱ्या दिवशी 10.55 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 11.45 कोटी रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे 4 दिवसांत या चित्रपटानं एकूण 33.2 कोटींचा गल्ला जमवला आहे. आता हा चित्रपट येणार काळात 100 कोटीचा आकडा पार करणार की नाही हे काही दिवसात समजेल.

हेही वाचा :

  1. विकी कौशल स्टारर 'बॅड न्यूज'नं केली रिलीजच्या पहिल्या दिवशी छप्परफाड कमाई - Bad Newz Box Office
  2. 'बॅड न्यूज' ठरतोय नॉन-स्टॉप एंटरटेनमेंट, विकी कौशलच्या परफॉर्मन्सवर नेटिझन्स फिदा - Bad Newz X Review
  3. विकी कौशलनं जुन्या आठवणींना उजाळा देत पत्नी कतरिना कैफला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - KATRINA KAIF

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.