ETV Bharat / entertainment

लालबागच्या राजाला भेट देताना विकी कौशलला चाहत्यांनी सेल्फीसाठी धरलं वेठीस - Vicky Kaushals video viral

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 12, 2024, 6:31 PM IST

Vicky Kaushal : विकी कौशल हा पत्नी कतरिना कैफशिवाय लालबागच्या राजाचं दर्शन करण्यासाठी गेला. यावेळी विकीला त्याच्या चाहत्यांनी घेरलं आणि त्याच्याबरोबर सेल्फी घेतल्या. यानंतर तो ईशा देओलला देखील यावेळी भेटला.

Vicky Kaushal
विकी कौशल (विकी कौशल (ANI))

मुंबई Vicky Kaushal : मुंबईतील 'लालबागचा राजा' गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी विकी कौशल गेला होता. विकीच्या आधी अनेक स्टार्सनी येथे येऊन बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. यामध्ये रणबीर कपूर आपल्या कुटुंबासह बाप्पाच्या दर्शनासाठी गेला होता. आता विकी कौशल बाप्पाचे आशीर्वाद घेत असतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक पोलीस विकी कौशलबरोबर सेल्फी घेताना दिसत आहे. यानंतर विकी कौशलनं देखील आनंदानं पोलीस फॅनबरोबर सेल्फी काढली. बाप्पाच्या दर्शनासाठी विकी हा एकटाच पोहोचला होता. विकीबरोबर त्याची पत्नी कतरिना कैफही दिसली नाही. दरम्यान विकीच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर यावेळी त्यानं पांढरा शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. याशिवाय त्यानं त्याच्या पायात चप्पल घातलेली नव्हती. तो गणेशाच्या दर्शनासाठी अनवाणी पायानं चालत आला.

विकी कौशलचा व्हिडिओ व्हायरल : आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये, विकी कौशल ईशा देओलला भेटतो आणि दोघे रस्त्यावर चाहत्यांबरोबर मस्ती करताना दिसतात. आता त्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. आता हे व्हिडिओ अनेकांना आवडत आहेत. विकीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका चाहत्यानं या व्हिडिओवर लिहिलं, "हा खूप सुंदर दिसतो." दुसऱ्या एकानं या पोस्टवर लिहिलं, " कतरिना कैफ कुठे आहे." आणखी एकानं लिहिलं, "खूप सुंदर." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करताना दिसत आहेत.

विकी कौशल (विकी कौशल (ANI VIDEO))

विकीचं सध्या चाललंय तरी काय : विकी कौशलच्या फिल्म वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी ' बॅड न्यूज 'या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्याबरोबर अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि पंजाबी स्टार एमी विर्क हे होते. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला. हा एक कॉमेडी चित्रपट होता. पुढं तो 'छावा' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. 'छावा' हा ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार असून साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्ना त्यांच्या पत्नी येसूबाईच्या भूमिकेत दिसेल. 'छावा' हा चित्रपट याच वर्षी 6 डिसेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या दिवशी, साउथ सिनेमाचा मोस्ट अवेटेड अल्लू अर्जुन स्टारर चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' देखील रिलीज होईल.

हेही वाचा :

  1. चांगली बातमी 'बॅड न्यूज' ओटीटीवर रिलीज - Vicky Kaushal and Tripti Dimri
  2. स्त्रीनं जगभरात केली 500 कोटींची कमाई, विकी कौशलला होतोय 'त्या' गोष्टीचा पश्चाताप - vicky kaushal
  3. सिंहाच्या गर्जनेसह 'छावा' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ - Vicky Kaushal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.