ETV Bharat / state

लाडक्या बाप्पाच्या निरोपासाठी मुंबईकरांची तुफान गर्दी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही दिला गणरायाला निरोप - Ganesh Visarjan 2024

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2024, 10:52 PM IST

Ganesh Visarjan 2024 : राज्यात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता झाली. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईत गणेश भक्तांचा महापूर पाहायला मिळाला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.

Ganesh Visarjan 2024
बाप्पाच्या निरोपासाठी मुंबईकरांची तुफान गर्दी (Source - ETV Bharat)

मुंबई Ganesh Visarjan 2024 : गेले दहा दिवस गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यावर आज गणरायाला निरोप देण्याची वेळ आली. मुंबईत सकाळपासूनच गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला सुरूवात झाली. मुंबईकरांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेसह मुंबई पोलीस कर्मचारी गिरगाव चौपाटीवर तैनात केले होते. गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं तब्बल 12000 कर्मचारी तैनात केले होते. तसंच 23 हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईकरांच्या सेवेसाठी ठेवण्यात आला. सोबतच विविध सेवाभावी संस्था, महाविद्यालयीन विद्यार्थी हे देखील गिरगाव चौपाटी येथे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत.

सकाळी सुरुवातीला लहान आकाराच्या मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. त्यानंतर साधारण तीन वाजेच्या सुमारास मोठ्या उंचीचे गणपती गिरगाव चौपाटी येथे दाखल होण्यास सुरुवात झाली होती. दुपारपर्यंत गिरगाव चौपाटीवर तेजुकाया, अंजिरवाडी, खेतवाडी आणि कामाठीपुरा येथील गणपती दाखल झाले होते. पालिकेच्या आकडेवारीनुसार, दुपारी तीन वाजेपर्यंत 2697 गणपतींचं विसर्जन करण्यात आलं. यातील 71 सार्वजनिक मंडळांचे गणपती असून, 2614 घरगुती गणपती विसर्जन करण्यात आले. यात 12 गौरी देखील असल्याची माहिती पालिकेनं दिली. 2697 पैकी 1009 गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाल्याची माहिती पालिकेनं दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गणरायाला दिला निरोप : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आपल्या लाडक्या गणरायाला मनोभावे आरती करून निरोप दिला. गणपतीच्या विसर्जनापूर्वी फडणवीस यांनी काही निवडक पाहुण्यांच्या उपस्थितीत गणरायाची आरती केली आणि उत्तर पूजा करून गणरायाला शेवटचा निरोप दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि कन्या दिविजा उपस्थित होत्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेचं कल्याण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा, यासाठी गणरायाला साकडं घातलं.

प्रवीण दरेकरांच्या गणपती विसर्जनालाही उपस्थिती : देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचे आमदार आणि विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेतलं.

हेही वाचा

  1. बाप्पा निघाले गावाला...अमरावतीत छत्री आणि वडाळी तलावात गणरायाचं विसर्जन, पोलिसांचा तगडा बंदोबस्त - Amravati Ganpati Visarjan
  2. ढोल-ताशाच्या गजरात पुणेकरांचा गणरायाला निरोप, मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, पाहा ड्रोन व्हिडिओ - Pune Ganpati Visarjan 2024
  3. लाडक्या गणरायाला आज निरोप... मुंबईत 24,000 हून अधिक पोलीस तैनात - Ganesh visarjan 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.