मुंबई : अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ हे बॉलिवूडमधील पॉवरपॅक जोडप्यांपैकी एक आहेत. या जोडप्याच्या लग्नाला तीन वर्षे झाली आहेत. आज 9 डिसेंबर रोजी या जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. रिपोर्ट्सनुसार, हे जोडपे जोधपूरमध्ये त्यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहेत. जोधपूरमधून विकी आणि कतरिनाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. याशिवाय 8 डिसेंबर रोजी हे जोडपे मुंबईहून जोधपूरला रवाना झाले होते. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये विकी आणि कतरिना जोधपूर विमानतळावरून बाहेर पडताना दिसत आहेत.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाचा वाढदिवस : व्हिडिओमध्ये हे जोडपे हसत हसत विमानतळाच्या बाहेर, हातात हात घालून त्यांच्या कारच्या दिशेनं जाताना दिसत आहेत. याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये या जोडप्यानं हात पकडून पापाराझींना फोटोसाठी पोझ दिली. दरम्यान एअरपोर्ट लूकमध्ये विकीनं निळ्या रंगाचा डेनिम शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती. दुसरीकडे कतरिनानं यावेळी गुलाबी रंगाच्या सूट घातला होता. यावर तिनं लाईट मेकअप केला होता. याशिवाय तिनं या लूकला आणखी विशेष बनविण्यासाठी सनग्लास घातला होता. रिपोर्ट्सनुसार, विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस खाजगी ठेवला आहे. विकी आणि कतरिना यांच्या लग्नाच्या वाढदिवसामध्ये त्यांचे कुटुंबीयही उपस्थित राहणार असल्याचा अंदाज आता लावला जात आहे.
#VicKat enroute to #Jodhpur for anniversary celebrations 🍾 #KatrinaKaif #VickyKaushal pic.twitter.com/FgW7Q8QbTJ
— 𝖪𝖺𝗍𝗋𝗂𝗇𝖺 𝖪𝖺𝗂𝖿 𝖥𝖺𝗇𝗌 (@KatrinaKaifCafe) December 8, 2024
Vickat papped at Jodhpur Airport#katrinakaif #vickykaushal pic.twitter.com/sl3xkSD45D
— Golden Kay (@goldfishkat) December 8, 2024
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच वर्कफ्रंट : विकी कौशल शेवटी 'बॅड न्यूज' या चित्रपटामध्ये तृप्ती डिमरीबरोबर दिसला होता. आता पुढं तो 'छावा' या चित्रपटात दिसणार आहे. दिनेश विजन दिग्दर्शित या चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना देखील असणार आहे. याशिवाय विकी कौशलकडे संजय लीला भन्साळी यांचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपटही आहे, यामध्ये त्याच्याबरोबर रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे दोघेही असणार आहेत. दुसरीकडे कतरिना शेवटी विजय सेतुपतीबरोबर 'मेरी ख्रिसमस'मध्ये दिसली होती. आता पुढं ती फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात झळकणार आहे.
हेही वाचा :