ETV Bharat / entertainment

सुपरस्टार रजनीकांतच्या डबिंग सेशनचा 'वेट्टय्यान' निर्मात्यांनी बीटीएस व्हिडिओ केला शेअर - Vettaiyan makers BTS video

author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 31, 2024, 4:31 PM IST

Rajinikanth Vettaiyan: साऊथ सुपरस्टार रजनीकांतनं 'वेट्टय्यान' चित्रपटाचं डबिंग सत्र पूर्ण केलंय. आता याचा व्हिडिओ लायका प्रॉडक्शननं आपल्या अधिकृत पेजवर शेअर केला आहे.

Rajinikanth Vettaiyan
रजनीकांत वेट्टय्यान (Etv Bharat)

मुंबई- Superstar Rajinikanth : सुपरस्टार रजनीकांत मोस्ट अवेटेड चित्रपट 'वेट्टय्यान'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची बऱ्याचं दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. 'वेट्टय्यान'मध्ये रजनीकांत निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. दरम्यान, सोशल मीडियावर रजनीकांतचा एक बीटीएस व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रजनीकांत हा 'वेट्टयान'च्या डबिंग सेशनमध्ये दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा नेहमीप्रमाणेच स्वॅग पाहायला मिळाला. रजनीकांतबरोबर या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन, फहाद फासिल, राणा दग्गुबती, मंजू वॉरियर यांच्या देखील भूमिका आहेत.

रजनीकांतचा डबिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल : व्हिडिओमध्ये, रजनीकांत हा कॅज्युअल लूकमध्ये दिसला. डबिंग सत्रासाठी त्यानं पांढरा कुर्ता आणि लुंगी परिधान केली होती. पडद्यामागील व्हिडिओत, रजनीकांत त्याच्या कारमध्ये डबिंगसाठी स्टुडिओमध्ये जाताना दिसला, यानंतर तो 'वेट्टय्यान'ची टीम आणि दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांना भेटला. निर्मात्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रजनीकांत त्यांच्या चित्रपटाचे डायलॉग बोलताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - 'सुपरस्टार रजनीकांत डबिंग सत्रात. 10 ऑक्टोबरला वेट्टय्यान हा चित्रपट तामिळ, तेलुगू, हिंदी आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.' आता अनेकजण या पोस्टवर चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात असल्याचं म्हणताना दिसत आहेत.

'वेट्टय्यान' चित्रपटाबद्दल : 'वेट्टय्यान'चा अर्थ 'शिकारी'. 'वेट्टायन' हा अमिताभ बच्चन यांचा तमिळमधील पहिला चित्रपट आहे. 'वेट्टय्यान' चित्रपट हा लायका प्रॉडक्शन अंतर्गत सुबास्करन अलीराजा याची निर्मिती आहे. या चित्रपटाला अनिरुद्ध रविचंदर यांनी संगीत दिलं आहे. हा चित्रपट 160 कोटीच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला आहे. या चित्रपटाकडून रजनीकांतला खूप अपेक्षा आहेत. दरम्यान रजनीकांत शेवटचा 'लाल सलाम' चित्रपटामध्ये दिसला होता. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर पाहिजे तशी कमाई करू शकला नाही. त्याच्या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन नेल्सन दिलीप कुमार करत आहे. याशिवाय तो 'कुली' चित्रपटांमध्ये देखील झळकेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन लोकेश कानगराज करणार आहे.

हेही वाचा :

  1. रजनीकांतच्या 'वेट्टियान'चे दिवाळीत रिलीजचे संकेत, अजितच्या चित्रपटाशी होऊ शकते बॉक्स ऑफिसवर टक्कर - Vettayaan hints at Diwali release
  2. रजनीकांत स्टारर 'वेट्टयान'च्या ओपनिंग सॉन्गमध्ये अनिरुद्ध रविचंदरची डान्स क्लिप लीक - vettaiyan Movie
  3. रजनीकांतला इकॉनॉमी क्लासमध्ये पाहून सहप्रवाशांना गगन ठेंगणे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.