ETV Bharat / entertainment

उर्वशी रौतेलानं जिममधून शेअर केला ज्युनियर एनटीआरबरोबरचा सेल्फी, वाचा युजर्सच्या प्रतिक्रिया - Urvashi Rautela - URVASHI RAUTELA

Urvashi Rautela : अभिनेत्री उर्वशी रौतेलानं नुकतीच साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरची जिममध्ये भेट घेतली आणि सेल्फीही घेतला. हा फोटो तिनं सोशल मीडियावर शेअर करताच युजर्सनी उत्स्फूर्त प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 15, 2024, 2:53 PM IST

मुंबई - Urvashi Rautela : बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आणि अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या उर्वशी रौतेलानं पुन्हा एकदा असेच काम केलं आहे. यामुळं ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. उर्वशी रौतेला सध्या तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आहे. उर्वशीनं जिममधला एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये ती साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरबरोबर दिसत आहे. उर्वशानं हा फोटो शेअर करत एक लांबलचक कॅप्शनही लिहिली आहे.

"ज्युनियर एनटीआर गारु, आमचे प्रिय ग्लोबल सुपरस्टार, अतिशय दुर्मिळ शिस्तप्रिय, प्रमाणिक, नम्र आणि नेहमी सरळ बोलणारे, तुमच्या विनम्रतेबद्दल आणि प्रेरणासाठी धन्यवाद. तुमचं सिंहासारखं काळीज असलेलं व्यक्तीमत्व खरोखर कौतुकास्पद आहे. आगामी काळात तुमच्याबरोबर काम करण्यासाठी जास्त काळ प्रतीक्षा करु शकत नाही," उर्वशीनं पोस्टबरोबरच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय. उर्वशीने जिममधून शेअर केलेल्या ज्युनियर एनटीआरबरोबरच्या फोटोत शेअर अभिनेत्री निऑन रंगाच्या जिमवेअरमध्ये दिसत आहे आणि ज्युनियर एनटीआर काळ्या टी-शर्टमध्ये दिसत आहे.

युजर्सच्या प्रतिक्रिया

उर्वशी रौतेलानं एकादी पोस्ट शेअर केली आणि त्यावर युजर्स कमेंट केले नाहीत असं होणं अशक्य आहे. साऊथ सुपरस्टार ज्यु. एनटीआरबरोबरच्या उर्वशीच्या या सेल्फीवर एका यूजरने लिहिले आहे, 'ज्युनियर एनटीआर म्हणजे काय?' एकाने लिहिले आहे की, 'इतका फिल्टर लावला आहे की ज्युनियर एनटीआर ओळखता; येत नाही'. एकाने लिहिले आहे, 'काहीतरी मोठं घडणार आहे असे वाटतंय.'

ज्युनियर एनटीआर सध्या त्याच्या 'देवरा पार्ट 1' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्याबरोबर जान्हवी कपूर आणि सैफ अली खान दिसणार आहेत. हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. ईडन गार्डन्सवर दिसली किंग खान शाहरुखची जादू! अबराम, सुहाना आणि अनन्या पांडेसह साजरा केला केकेआरचा विजय - Shah Rukh Khan
  2. शाहरुख चमकला, तापसी लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली, स्टार स्टडेड पार्टीत इम्रान हाश्मीची मल्लिकाशी भेट - ANAND PANDIT PARTY
  3. रजनीकांतच्या 'थलैयवा 171' मध्ये शाहरुख खानची एन्ट्री? बॉक्स ऑफिसवर होऊ शकतो भुकंप - Thalaiyava 171

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.