ETV Bharat / entertainment

उर्वशी रौतेलाचा सिंड्रेला बनत लाल गाऊनसह कान्स 2024 मध्ये दबदबा - CANNES FILM FESTIVAL 2024 - CANNES FILM FESTIVAL 2024

कान्स 2024 मधील उर्वशी रौतेलाचा दुसरा लूक देखील समोर आला आहे. लाल गाऊनमध्ये ती सिंड्रेला लूकमध्ये दिसत आहे.

Urvashi Rautela
उर्वशी रौतेला (Urvashi Rautela Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 17, 2024, 5:22 PM IST

मुंबई - कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये उर्वशी रौतेला पुन्हा एकदा तिची जादू दाखवताना दिसत आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये पोहोचलेल्या उर्वशीनं तिचा दुसरा लूकही तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केला आहे. यापूर्वी, उर्वशीनं कान्स 2024 मध्ये तिच्या पहिल्या दिवशी एक सुंदर आणि बोल्ड गुलाबी गाऊन परिधान केला होता. आता तिनं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फ्रेंच रिव्हिएराच्या पॉईंटवरून स्वतःचा आणखी एक सुंदर व्हिडिओ शेअर केला आहे. कान्समध्ये दुसऱ्या दिवशी ही अभिनेत्री सिंड्रेला लूकमध्ये दिसली. उर्वशीनं लाल रंगाचा सुंदर गाऊन परिधान केला असून यातील अनेक फोटो ती चाहत्यांसाठी पाठवत आहे.

उर्वशीचा सिंड्रेला लूक

उर्वशी रौतेलानं तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये उर्वशी फ्रेंच रिव्हिएरा पॉईंटवर उभी असताना तिचे फोटो क्लिक करत आहे. अभिनेत्रीनं कान्स 2024 मधील तिचा दुसरा लूक शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये फ्रान्सिस फोर्ड कोपोलाच्या मेगालोपोलिसच्या प्रीमियरला गेले होते, माझा कस्टम गाऊन एका ट्युनिशियन डिझायनरने बनवला होता."

याआधी उर्वशीने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 च्या ओपनिंग सेरेमनीमध्ये गुलाबी रंगाचा गाऊन घातला होता. तिचा हा गाऊन दीपिका पदुकोणच्या कान्स 2018 ची आठवण करून देणारा होता. गेल्या वर्षी 2023 मध्ये देखील उर्वशी रौतेलानं तिच्या कान्स लूकनं जगभरातील चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. वर्क फ्रंटवर, उर्वशी शेवटची यो यो हनी सिंगच्या 'विगडिया हिरण' या गाण्यात दिसली होती.

बॉलीवूडची सुंदर अभिनेत्री आणि अनेकदा वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहणाऱ्या उर्वशी रौतेला सध्या कान फिल्म फेस्टीव्हलमध्ये आपली जादु दाखवत आहे. अलिकडेच ती तिच्या नव्या फोटोमुळे चर्चेत आली होती. उर्वशीनं जिममधला एक सेल्फी शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये ती साऊथचा सुपरस्टार ज्युनियर एनटीआरबरोबर दिसत होती.

हेही वाचा -

  1. तरुणाईच्या समस्या मांडणाऱ्या 'विषय हार्ड' चित्रपटाचं मोशन पोस्टर लॉन्च - Vishay Hard Motion poster
  2. मुंबईतील होर्डिंग अपघातात कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, अंत्यसंस्काराला कार्तिकची हजेरी - Mumbai billboard crash
  3. उर्वशी रौतेलानं जिममधून शेअर केला ज्युनियर एनटीआरबरोबरचा सेल्फी, वाचा युजर्सच्या प्रतिक्रिया - Urvashi Rautela

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.