मुंबई - Uorfi Javed And Ananya Panday : अभिनेत्री उर्फी जावेदला फिल्म इंडस्ट्रीमध्ये तिच्या वेगळ्या फॅशनसाठी ओळखले जाते. प्रत्येक वेळी ती तिच्या वेगळ्या लूकनं सर्वांना थक्क करत असते. अलीकडेच ती 'फॉलो कर लो यार' या वेब सीरीजच्या प्रमोशनसाठी थ्रीडी लिझार्ड ड्रेसमध्ये दिसली. या कार्यक्रमादरम्यान ती अनन्या पांडेला भेटली. तिचा ड्रेस पाहून अनन्याला देखील धक्का बसला. यावेळी तिनं तिच्या ड्रेसवर लिझार्डची डिझाईन काढली होती. तिची ही कल्पना अनेकांना आवडली. दरम्यान उर्फी आणि अनन्यानं यावेळी एकमेकांच्या 'फॉलो कर लो यार' आणि 'कॉल मी बे' या वेब सीरीजचं देखील प्रमोशन केलं.
उर्फीच्या थ्रीडी लिझार्ड ड्रेसनं सर्वजण थक्क : उर्फी प्रत्येक वेळी तिच्या कपड्यांसह काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी उर्फीनं मेट गाला 2024 मध्ये थ्रीडी बटरफ्लाय गाऊन घातला होता. आता तिनं पुन्हा थ्रीडी लिझार्ड ड्रेस घालून सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. अनन्या देखील या प्रमोशनल कार्यक्रमात उर्फीच्या ड्रेसचे कौतुक केलंय. उर्फी आणि अनन्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर चाहते भरपूर कमेंट करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "उर्फी ही खूप सुंदर कपडे आता बनवत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "अनन्या उर्फीबरोबर खूप अस्वस्थ वाटत आहे." आणखी एकानं लिहिलं, "मी जर एक लिझार्ड असतो तर." याशिवाय उर्फी जावेदच्या या पोस्टवर अनेकजण हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.
उर्फीची आगामी वेब सीरीज कधी होणार रिलीज : उर्फीची 'फॉलो कर लो यार' ही वेब सीरीज 23 ऑगस्टपासून अॅमेझॉन प्राईमवर प्रसारित होणार आहे. ही वेब सीरीज पाहण्यासाठी आता अनेकजण उत्सुक आहेत. यापूर्वी उर्फी जावेदनं या वेब सीरीजच्या प्रमोशनसाठी एक वेगळा मार्ग वापरला होता. तिनं इंस्टाग्रामवर काही स्टार्सला संदेश पाठवून 'फॉलो कर लो यार' हे काव्यात्मक शैलीत म्हटलं होत. यानंतर तिनं तिच्या पेजवर काही स्क्रीनशॉट शेअर केले होते. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.
हेही वाचा :