ETV Bharat / entertainment

'व्हॅलेंटाईन डे'ला पती पत्नीला कोणती भेट देतात, अभिनेत्री ट्विंकल खन्नाची पोस्ट चर्चेत - ट्विंकल खन्ना व्हॅलेंटाइन डे पोस्ट

Twinkle Khanna Valentines Day: बॉलीवूड अभिनेत्री ट्विंकल खन्नानं व्हॅलेंटाईन डेबद्दलची लांबलचक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

Twinkle Khanna Valentines Day
ट्विंकल खन्ना आणि व्हॅलेंटाईन डे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 11, 2024, 3:51 PM IST

मुंबई - Twinkle Khanna : अभिनेता अक्षय कुमारची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्ना नेहमीच तिच्या लेखन कौशल्यामुळे चर्चेत असते. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना हे बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. ट्विंकल खन्नानं व्हॅलेंटाइन डेच्या आधी एक मजेदार पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. ट्विंकलनं व्हॅलेंटाईन डेबद्दल लिहिलं, ''व्हॅलेंटाईन डे एक प्रयोग म्हणून सुरू झाला असण्याची शक्यता असू शकते. कारण काहीजण बोर्ड मीटिंगमध्ये ख्रिसमसनंतर विक्री कमी झाल्याबद्दल चर्चा करतात. उरलेल्या भेटवस्तूतून कमाई कशी होईल याबद्दल विचार करतात. आता, लोकांना या भेटवस्तू खरेदी करण्यासाठी कसे प्रवृत्त करता येईल याचा विचार केला नक्कीच होत असणार. याशिवाय जर्मन-अमेरिकन तज्ञ हन्ना एरेन्ड्ट यांनी एकदा म्हटलं होतं की, '' काही अनुभव कधी समोर येतात जेव्हा कोणी बोलत असेल.' व्हॅलेंटाईन डे कदाचित प्रेमाला अधिक मजबूत बनवतो.'' ट्विंकलच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत.

ट्विंकल खन्नानं भारतीय पतीबद्दल केलं : अभिनेत्री ट्विंकल खन्ना पुढं लिहिलं, ''ज्या महिलांच्या लग्नाला एका दशकापेक्षा जास्त झाले आहे, त्यांना प्रश्न विचारा. व्हॅलेंटाईन डेला तुमच्या पतीनं तुम्हाला काय दिले? तर त्याचे सर्वात प्रामाणिक उत्तर असेल, 'नेहमीप्रमाणे, डोकेदुखी.' प्रेमामुळे नातं खूप मजबूत होतं. भारतीय पती आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतात. त्यामुळे त्यांची डोकेदुखी बनणे हे आपल्यासाठी व्हॅलेंटाईन डे गिफ्टपेक्षा कमी नाही.'' ट्विंकल खन्ना अनेकदा तिच्या कुटुंबासह फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता ट्विंकल ही चित्रपटसृष्टीपासून दूर आहे.

ट्विंकल खन्ना आणि अक्षय कुमारचं लग्न : अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नानं 2001 मध्ये लग्न केलं होतं. या जोडप्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. ट्विंकल खन्नाला चित्रपटसृष्टीत तिच्या सक्षम भूमिकांसाठी ओळखली जाते. तिनं आपल्या करिअरची सुरुवात 'बरसात' या चित्रपटापासून केली होती. तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. तिनं अनेक चित्रपटामध्ये काम केलं आहे. तिचा आमिर खानबरोबर असलेला चित्रपट 'मेला' हा प्रचंड गाजला होता.

हेही वाचा :

  1. किरण रावनं 'लाल सिंग चड्ढा'च्या बॉक्स ऑफिसवरील निराशाजनक कामगिरीबद्दल केला खुलासा
  2. 'तेरी बातों में उल्झा जिया'च्या कमाईत वाढ ; रिलीच्या दुसऱ्या दिवशी केली 'इतकी' कमाई
  3. कतरिना कैफ बनली चेन्नई सुपर किंग्जची ब्रँड ॲम्बेसिडर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.