ETV Bharat / entertainment

टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीच्या घरी आली लक्ष्मी, पोस्ट व्हायरल... - TV ACTRESS DRASHTI DHAMI

टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीनं तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदीची बातमी दिली आहे. तिला कन्यारत्न प्राप्त झाली आहे.

Drashti dhami
दृष्टी धामी (Drashti dhami - ANI Photo)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 23, 2024, 2:46 PM IST

मुंबई - अलीकडेच, टीव्हीचे प्रसिद्ध जोडपे युविका चौधरी आणि प्रिन्स नरुला यांनी त्यांच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली होती. या जोडप्यानं मुलीच्या जन्माची घोषणा केल्यानंतर हे दोघेही प्रसिद्धीझोतात आले. याशिवाय या दोघांनी त्यांच्या मुलीची पहिली झलकही चाहत्यांबरोबर शेअर केली. आता या गुड न्यूजनंतर टीव्हीची आणखी एक सुंदरी अभिनेत्री आई झाली आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामीच्या घरात लक्ष्मीचं आगमण झालं आहे. दृष्टी धामी लग्नाच्या 9 वर्षानंतर आई झाल्यानंतर तिचे चाहते देखील खुश आहेत.

टीव्ही अभिनेत्री दृष्टी धामी झाली आई : अनेकजण तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. 41आठवड्यांनंतरही तिची प्रसूती झालेली नाही असं तिनं यापूर्वी सांगितलं होतं. दृष्टी 10 महिन्यांपासून आपल्या मुलीच्या जन्माची वाट पाहत होती. तिनं 22 ऑक्टोबर रोजी एका मुलीला जन्म दिला. याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून तिनं सांगितलं. दृष्टी धामीनं इंस्टाग्रामवर एक अतिशय गोंडस व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं,'स्वर्गातून थेट आमच्या हृदयात, एक नवीन सुरुवात. 22.10.24 ती येथे आहे! उत्सुक पालक दृष्टी आणि नीरज.'

गर्भधारणेच्या 10व्या महिन्यात झाली प्रसूती : दृष्टी धामीच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत चाहते आणि अनेक स्टार्सनीही तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान दृष्टीनं 2015 मध्ये बिझनेसमन नीरज खेमकाबरोबर लग्न केलं. लग्नाच्या 9 वर्षांनंतर तिनं गर्भधारणेची घोषणा करून तिच्या चाहत्यांना एक सुखद धक्क दिला. दृष्टीनं यापूर्वी नियोजित तारखेला एक मजेदार व्हिडिओ देखील शेअर केला होता, यात तिनं सांगितलं की, डॉक्टरनं दिलेल्या तारखेवर तिची प्रसूती झालेली नाही. दरम्यान दृष्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं अनेक टीव्ही मालिकेत काम केलंय. 'मधुबाला - एक इश्क एक जुनून', 'दिल मिल गये', 'एक था राजा एक थी राणी' 'गीत - हुई सबसे परायी' आणि इतर अनेक मालिकेत ती दिसली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.