ETV Bharat / entertainment

तृप्ती दिमरीनं 'पुष्पा 2'मध्ये सामंथा रुथ प्रभूची घेतली जागा, अल्लू अर्जुनबरोबर करणार डान्स नंबर - tripti dimri and pushpa 2 - TRIPTI DIMRI AND PUSHPA 2

Tripti Dimri Pushpa 2 Dance Number : तृप्ती दिमरी आता 'पुष्पा 2: द रुल'मध्ये अल्लू अर्जुनबरोबर आयटम नंबर करताना दिसणार आहे. तृप्तीनं आता सामंथा रुथ प्रभूची जागा घेतली आहे.

Tripti Dimri Pushpa 2 Dance Number
तृप्ती दिमरी पुष्पा 2 डान्स नंबर (तृप्ती दिमरी (IMAGE - IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 23, 2024, 5:33 PM IST

मुंबई - Tripti Dimri Pushpa 2 Dance Number : 'ॲनिमल' फेम 'भाभी 2' या नावानं ओळखली जाणारी अभिनेत्री तृप्ती दिमरी आता अनेक चित्रपटांमध्ये आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'ॲनिमल'च्या यशानं तृप्तीचं नशीबही खुललं आहे. तिला अनेक चित्रपटाच्या ऑफर्स येत आहेत. तृप्ती साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा 2'मध्ये एंट्री करत आहे. रिपोर्ट्सवर 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटात साऊथ ब्युटी सामंथा रुथ प्रभूप्रमाणे मसालेदार डान्स नंबर करताना दिसणार आहे. तृप्तीनं सामंथाची जागा घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र निर्मात्यांकडून अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तृप्ती दिमरी घेणार 'पुष्पा 2 द रुल'मध्ये एंट्री : तृप्ती दिमरी 'पुष्पा 2 द रुल'च्या आयटम नंबरमध्ये अल्लू अर्जुनबरोबर तिची जादू दाखवणार आहे. 'पुष्पा द राइज'मधील 'ऊ अंतवा' हे गाणं खूप हिट झालं होतं, या गाण्याचा प्रचंड क्रेझ होता.'ऊ अंतवा' गाण्यात सामंथानं धमाकेदार डान्स केला होता. 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाबद्दल दररोज काहीना काही अपडेट येत आहेत. दरम्यान यावेळी अल्लू अर्जुन 'पुष्पा 2: द रुल'मधून बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे, कारण या चित्रपटामधील 'पुष्पा पुष्पा' गाणं देखील हिट झालं आहे. 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील दुसर गाणं 'सुसेकी' हे 29 मे रोजी रिलीज होईल. आज 23 मे रोजी 'पुष्पा 2: द रुल'च्या निर्मात्यांनी याबद्दल अपडेट दिली आहे.

'पुष्पा 2 द रुल' हा 'इतक्या' भाषेत होईल रिलीज : सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 द रुल' या चित्रपटावर सध्या काम सुरू आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना आणि अल्लू अर्जुन व्यतिरिक्त फहद फासिल, विजय सेतुपती, साई पल्लवी, प्रियामणी, जगपती बाबू अनसुया भारद्वाज आणि प्रकाश राज यांच्या विशेष भूमिका असणार आहेत. हा चित्रपट 400 कोटीच्या बजेटमध्ये बनविल्या जात आहे. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मुव्ही मेकर्सनं केली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी बॉक्स ऑफिसवर तेलगू, हिंदी, तमिळ, कन्नड, बंगाली आणि मल्याळम भाषांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. बंगाली भाषेत प्रदर्शित होणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे.

हेही वाचा :

  1. जान्हवी कपूरनं बीएफएफ ओरीबरोबर पारंपारिक गुजराती जेवणाचा घेतला आस्वाद - janhvi kapoor
  2. रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रभासनं केलं 'बुज्जी'चं लॉन्चिंग, 'कल्की 2898 एडी' इतिहास घडवेल चाहत्यांना विश्वास - Ramoji Film City
  3. 'सावी'चं कथानक पौराणिक कथेशी जोडलेलं असल्याचा अभिनय देवनं केला खुलासा - Abhinay Dev

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.