ETV Bharat / entertainment

"एक था राजा, एक थी रानी, जात अलग थी...खतम कहानी" : 'धडक 2' ची अधिकृत घोषणा - Dhadak 2 Announced - DHADAK 2 ANNOUNCED

Dhadak 2 Announced : तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी स्टारर करण जोहरच्या 'धडक 2' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ही एका दलित मुलाच्या आंतरजातीय प्रेमाची कथा आहे. एका टीझरसह या नव्या चित्रपटाची घोषणा निर्माता करण जोहरनं केली आहे.

Dhadak 2 Announced
'धडक 2' ची अधिकृत घोषणा (Image from Dhadak teaser)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 27, 2024, 4:25 PM IST

मुंबई - Dhadak 2 Announced : बॉलिवूड निर्माता करण जोहरनं आज 27 मे रोजी आंतरजातीय प्रेमकथेवर आधारित 'धडक 2' या रोमँटिक ड्रामा चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं मोशन पोस्टर आणि टीझर शेअर केला आहे. 'गली बॉय' फेम अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी अभिनीत या चित्रपटाची रिलीज डेटही करण जोहरनं उघड केली आहे. लोकप्रिय चित्रपट निर्माता करण जोहरबरोबर तृप्ती डिमरी पहिल्यांदाच काम करणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचं दिग्दर्शन शाझिया इक्बाल यांनी केलं आहे.

झी स्टुडिओ आणि धर्मा प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या 'धडक 2' च्या मोशन पोस्टरमध्ये सुरूवातीला काही मजकूर पाहायला मिळतो. त्यानंतर पडद्यावर 'शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा' हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनुयायांना दिलेला संदेश दिसतो. सामाजिक परिवर्तनाच्या अनेक घोषणाही पडद्यावर टेक्स्ट स्वरुपात पाहायला मिळतात. त्यानंतर हिंदीमध्ये

"एक था राजा

एक थी रानी

जात अलग थी

खतम कहानी"

हे वाक्य असलेलं अक्षरं उमटतात. यानंतर सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी यांचा चेहरा असलेलं चित्र झळकत. दोघांमधील प्रेमाबद्दलचा एक संवाद ऐकू येतो. तो म्हणते, "जो सपना तुम देख रही हो ना विधी, उस में मेरे लिए कोइ जगह नहीं है." याच्या उत्तरादाखल ती म्हणते, "तो यह भी बता दो निलेश, इन फिलींग्ज का क्या करुँ." नीलेशच्या भूमिकेत सिद्धांत चतुर्वेदी दिसणार असून विदिशाच्या भूमिकेत तृप्ती दिसणार आहे.

झी स्टुडिओ, धर्मा प्रॉडक्शन आणि क्लाउड 9 पिक्चर्स प्रस्तुत 'धडक 2' चा पहिला भाग 2018 मध्ये रिलीज झाला होता. जान्हवी कपूरने या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं आणि शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर यात मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाचे निर्माते करण जोहर, उमेश कुमार बन्सल, हिरू यश जोहर, अपूर्व मेहता, मीनू अरोरा आणि सोमेन मिश्रा आहेत. 'धडक 2' हा चित्रपट 22 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा -

केकेआरनं ट्रॉफी जिंकल्यावर बॉलीवूडमध्ये जल्लोष, करण जोहरसह 'या' स्टार्सनी केलं अभिनंदन - IPL 2024

केकेआरनं आयपीएलची ट्रॉफी उचलताच 'मिस्टर आणि मिसेस माही'चा स्टेडियमवर जल्लोष - IPL 2024

'केकेआर'च्या विजयानंतर शाहरुख खानचं कुटुंब झालं भावूक, बाप लेकीच्या डोळ्यात आनंदाश्रू - IPL 2024 Final

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.