ETV Bharat / entertainment

पाहा, सीमा बिस्वास स्टारर 'चलती रहे जिंदगी'चा ट्रेलर - Chalti Rahe Zindagi Trailer - CHALTI RAHE ZINDAGI TRAILER

Chalti Rahe Zindagi Trailer : मानवी स्वभावांची हृदयस्पर्शी कथा असलेल्या 'चलती रहे जिंदगी'चा ट्रेलर रिलीज झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान एका सोसायटीतील तीन कुटुंबांची आणि त्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवणाऱ्या पात्राची ही कथा आहे. मानवी नात्याचे अनेक रहस्यं उलगडणारी ही कथा असल्याचं ट्रेलरवरुन जाणवतं.

Seema Biswas
'चलती रहे जिंदगी'चा ट्रेलर (Chalti Rahe Zindagi poster)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 20, 2024, 10:46 AM IST

मुंबई - Chalti Rahe Zindagi Trailer : 'चलती रहे जिंदगी' या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवरील एक नाटयमय चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटात एका हौसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या तीन कुटुंबांची हृदयस्पर्शी कथा दाखवण्यात आली आहे.

लॉकडाऊन कशाप्रकारे दबून राहिलेलं सत्य उलगडतं आणि नातेसंबंधांच्या बंधनांची चाचणी कशी घेतं हे 'चलती रहे जिंदगी' चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटाची कथा कृष्ण भगत या स्थानिक ब्रेड सप्लायरच्या पात्रापासून सुरू होते. हा व्यक्ती दैनंदिन जीवनात या कुटुंबाशी कसा जोडला गेला आहे हे दिसत असतानाच जसजसा कोव्हिडिच्या साथीचा रोग प्रसार तीव्र होत जातो तसतसं त्यांचे जीवन तीन नाट्यमय टप्प्यांमध्ये उलगडतं, रहस्यं उघड होतं, आर्थिक संघर्ष आणि कौटुंबिक तणाव निर्माण होतो याचं चित्रण यात पाहायला मिळेल.

आरती एस. बागडी दिग्दर्शित आणि अजय कुमार सिंग, शाकीर खान आणि रोहनदीप सिंग निर्मित 'चलती रहे जिंदगी' या चित्रपटात अभिनेत्री सीमा बिस्वास, मंजरी फडणीस, सिद्धांत कपूर, त्रिमला अधिकारी, रोहित खंडेलवाल, इंद्रनील सेनगुप्ता आणि बरखा सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना, दिग्दर्शक आरती म्हणाली, "'चलती रहे जिंदगी' या चित्रपटातून आम्ही आम्हा सर्वांना स्पर्श केलेला एक अनोखा क्षण कॅप्चर करण्यासाठी निघालो आहोत. साथीच्या रोगाने आम्हाला थांबणं भाग पाडलं, चिंतन करायला लावलं आणि बऱ्याचदा आम्ही ज्या सत्यांकडे दुर्लक्ष करत होतो त्या सत्याचा सामना करण्यास भाग पाडलं. या चित्रपटातील पात्रांच्या मदतीनं आम्ही मानवी संकट, माणसांच्या स्वभावातील चांगलेपणा आणि संकटाला निर्धारानं सामोरं जाण्याची क्षमता हे पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट इथल्या प्रत्येक माणसाच्या सामर्थ्याला दिलेली सलामी आहे. याशिवाय मला विश्वास आहे की प्रेक्षक या चित्रपटाच्या पात्रांमध्ये थोडेसे स्वत:ला पाहतील आणि त्यांना त्यांच्या प्रवासात प्रेरणा मिळेल."

अभिनेत्री सीमा बिस्वास म्हणाल्या की,"चलती रहे जिंदगीमध्ये लीला हे पात्र साकारणं हा एक अतिशय मनाला भिडणारा अनुभव होता. हा चित्रपट असाधारण काळात सामान्य लोकांचा संघर्ष आणि त्यावरचा विजय सुंदरपणे कॅप्चर करतो. मला आशा आहे की प्रेक्षकांना या पात्रांमध्ये आणि त्यांच्या प्रवासात स्वतःचा एक भाग सापडेल."

'चलती रहे जिंदगी' हा चित्रपट येत्या 26 जुलै रोजी ZEE5 वर रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.