मुंबई - TRAILER OF KILL : लक्ष्य लालवानी मुख्य भूमिकेत असलेल्या अॅक्शन-थ्रिलर 'किल'चे निर्माते लवकरच चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. चाहत्यांमध्ये या चित्रपटापेक्षा अधिक अपेक्षा निर्माण करून, चित्रपटाचा निर्माता करण जोहरनं ट्रेलरच्या बातम्यांसह चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवली आहे.
करण जोहरनं यासाठी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केला आणि पोस्टला कॅप्शन दिलं, "भारतीय सिनेमानं आजपर्यंतच्या सर्वात रक्तरंजित राईडचा थरारक अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा! किल ट्रेलर लवकरच प्रदर्शित होत आहे! लक्ष्य लालवानी, राघव जुयाल आणि तान्या माणिकतला अभिनीत आणि निखिल नागेश भट लिखित आणि दिग्दर्शित किल हा चित्रपट भारतातील थिएटरमध्ये 5 जुलै रोजी रिलीज होत आहे. या चित्रपटात हिंसक दृष्य दिसणार आहेत ही गोष्ट प्रेक्षकांसाठी त्रासदायक असू शकते."
नवी दिल्लीत नियमित ट्रेनचा प्रवास करत असताना डांकूचा हल्ला होतो आणि त्याचा मुकाबला दोन कमांडो करतात आणि ही ट्रेन एका युद्ध भूमीत बदलून जाते. या चित्रपटात लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकताला वेगवान ट्रेनमध्ये अॅक्शन-पॅक्ड सीन करताना दिसणार आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल नागेश भट करत आहेत आणि करण जोहरनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'किल' चित्रपटाचा प्रीमियर 2023 मध्ये टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (TIFF) मध्ये झाला होता आणि आता हा चित्रपट 5 जुलै 2024 रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. हा चित्रपट पाहून काही समीक्षकांकडून थरारक ॲक्शन सीनसाठी रिव्ह्यू मिळवला आहे, ज्यामुळे लक्ष्यला फिल्म इंडस्ट्रीतील एक उगवता स्टार म्हणून गौरवण्यात आलंय.
लक्ष्य लालवानी, सुरुवातीला रोमँटिक कॉमेडी 'दोस्ताना 2' मध्ये पदार्पण करणार होता, आता तो 'किल'च्या मुख्य भूमिकेत आहे. त्याच्याबरोबर राघव जुयाल आणि तान्या माणिकतला आहेत. या कलाकारांचा वेगवान ट्रेनमध्ये झालेला तीव्र संघर्ष प्रेक्षकांना आचंबित करेल अशी अपेक्षा निर्माता म्हणून करण जोहरनं बाळगली आहे.
हेही वाचा -