ETV Bharat / entertainment

अजय देवगण प्रेक्षकांना का आवडतो याचं उत्तर देणारा 'नाम'चा ट्रेलर लॉन्च

Naam Trailer launch : अजय देवगणची दमदार भूमिका असलेल्या 'नाम' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अनिस बज्मी दिग्दर्शित या चित्रपटातील अजयची अ‍ॅक्शन प्रेक्षकांना आवडली आहे.

Naam Trailer launch
'नाम'चा ट्रेलर लॉन्च (Naam movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 3 hours ago

मुंबई - अनिस बज्मी दिग्दर्शित आणि अजय देवगणची दमदार भूमिका असलेल्या 'नाम' चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. एका बाजूला अजयच्या 'सिंघम अगेन' चित्रपट थिएटरमध्ये सुरू असताना त्याची बेफाम अ‍ॅक्शन, मती गुंग करुन सोडणारं कथानक आणि कसलेल्या कालाकारांची भूमिका असलेल्या 'नाम'चा ट्रेलर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

"इंटेन्स अ‍ॅक्शन आणि अविस्मरणीय नाट्याच्या पुन्हा जिवंत करणारा नाम चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला आहे. अजय देवगणचे आपण का चाहते आहोत याची आठवण हा ट्रेलर देत आहे", अशा आशयाची पोस्ट समीक्षक आणि ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांन लिहिली आहे.

'नाम'च्या या ट्रेलरमध्ये अजय देवगण आपला अनोखा अ‍ॅक्शन आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. यामध्ये अभिनेत्री समीरा रेड्डीला पाहूनही तिचे चाहते मनातून खूश झाले आहेत. या ट्रेलरमध्ये अभिनेत्री भूमिका चावलाही एक महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. यामध्ये राजपाल यादवही महत्त्वाची व्यक्तीरेखा साकारताना दिसत आहे.

'नाम'च्या ट्रेलरमधील वेगवान अ‍ॅक्शन अजय देवगणच्या लौकिकाला पुढं घेऊन जाणारी आहे. प्रेक्षकांना हा ट्रेलर पसंत पडल्याचं त्याच्या प्रतिक्रियावरुन दिसत आहे. दहा वर्षापूर्वी जेव्हा या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली तेव्हा अजय देवगण हा अफाट लोकप्रिय ठरत होता. त्याच्या प्रत्येक अ‍ॅक्शनला प्रेक्षकांचा होणारा गजर थिएटर दणाणून सोडत असे. परंतु नाम चित्रपटाला विलंब झाल्यामुळे अजयचे चाहते नाराज झाले होते. अखेर या चित्रपटाचा ट्रेलर आल्यामुळे चाहत्यांच्या अपेक्षा पुन्हा जाग्या झाल्या आहेत.

खरंतर 'नाम' हा चित्रपट 2014 पासून प्रलंबित आहे. गेली 10 वर्षे हा चित्रपट रखडला होता. अनिल रुंगटा निर्मित या चित्रपटाच्या निर्मात्यांपैकी एकाचं निधन झाल्यानंतर याचं काम थांबलं होतं. पण दमदार कथानक आणि भरपूर अ‍ॅक्शन असलेला हा चित्रपट अजय देवगणच्या चाहत्यांसाठी अनोखी भेट ठरु शकतो हा विश्वास निर्मात्यांना आहे. अखेर हा चित्रपट 22 नेव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. अजय देवगण आणि अनिस बज्मी यांचा हा चौथा एकत्रीत चित्रपट आहे. या दोघांनी यापूर्वी "हलचुल", 1995 मधील अ‍ॅक्शन थ्रिलर, रोमँटिक-कॉमेडी "प्यार तो होना ही था" (1998), आणि 2002 मधील सायकोलॉजिकल थ्रिलर "दीवानगी" सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.