ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रानं शेअर केले लेकीची 'तेव्हा आणि आता'चे न पाहिलेले फोटो - प्रियांका चोप्रा आणि मालती मेरी

प्रियांका चोप्रा तिची लेक मालती मेरी जोनाससह जुन्या आठवणीत रमली आहे. आपल्याला मुलगी होऊन दोन वर्षं पूर्ण झाली आहे, याचं तिला आश्चर्य वाटतं. तिनं आपल्या मुली बरोबरचा एक जुना आणि एक लेटेस्ट फोटो शेअर करुन एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

Priyanka Chopra
प्रियांका चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 27, 2024, 9:51 AM IST

मुंबई - भारताची देसी गर्ल प्रियांका चोप्रा हॉलिवूडमध्ये दाखल झाली आणि तिनं आपली प्रतिभा सिद्ध करत त्या फिल्म इंडस्ट्रीचा एक अविभाज्य भाग बनून गेली. गेल्या काही वर्षात ती ग्लोबल सेलेब्रिटी बनली आहे. आपला नाव लौकिक कमावल्यानंतर तिनं डिसेंबर 2018 मध्ये अमेरिकन संगीतकार निक जोनासशी लग्न करून तिच्या आयुष्यातील एक नवीन अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर या सेलिब्रिटी जोडप्याने 2022 मध्ये त्यांच्या पहिल्या मुलीचं स्वागत केलं. त्यांनी या आपल्या लाडक्या लेकीचं मालती मेरी जोनास असं नामकरण केलं आहे. गेल्या काही वर्षांच्या आठवणीत रमलेल्या प्रियांकानं लेकी बरोबरचा एक फोटो तिच्या सोशल मीडिया हँडवर शेअर केला आहे.

असं म्हणतात की आपण आपल्या आनंदी जगण्यात व्यग्र झालेलो असतो तेव्हा या मजेच्या दिवसात काळ कसा भुर्रकन निघून जातो याचा पत्ताही लागत नाही. ग्लोबल स्टार प्रियांकाच्या बाबतीतही काहीसं असंच घडलंय. तिची मुलगी मालती मेरीने त्यांच्या आयुष्यात प्रवेश करून दोन वर्षे उलटून गेली यावर तिचा विश्वास बसत नाही. प्रियांकानं काही वेळापूर्वी सोशल मीडियावर आपल्या प्रिय मुलीचे दोन सुंदर फोटो शेअर केले आहेत.

अलीकडेच काढलेल्या पहिल्या सेल्फीमध्ये मालती प्रियांकाच्या मांडीवर आरामशीर बसलेली दिसत आहे. प्रियांकानं मऊ राखाडी कार्डिगन परिधान करून, मालतीला तिच्या उबदारपणाच्या मायेत गुंतवलं आहे. पांढऱ्या आणि गुलाबी पोशाखात सुंदर दिसणाऱ्या या चिमुकलीनं आपल्याला अवाक केलं आहे. दुसऱ्या एका फोटोत लहान मालतीने आपल्या चिमुकल्या हातानं आईच्या गालाला स्पर्श केल्याचं दिसतं.

प्रियांका चोप्रानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "वेळ खरोखरच भुर्रकन उडून जाते. आठवड्याची सुरुवात अगदी योग्य झाली आहे. आठवणींत रमलेला सोमवार."

अनेक चाहत्यांनी प्रायांका चोप्रानं ही पोस्ट शेअर केल्यानंतर काही मिनिटांत मायलेकींचं कौतुक केलं. पोस्टवर प्रतिक्रिया देताना, एका युजरनं लिहिले: "तू सर्वात सुंदर स्त्री आहेस आणि ती सर्वात सुंदर मुलगी आहे." दुसऱ्याने कमेंट केली: "राणी आणि राजकुमारी! खूप सुंदर!"

व्यावसायिक आघाडीवर, जॉन सीना आणि इद्रिस एल्बा यांच्यासोबत प्रियांका चोप्रा 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये दिसणार आहे. ती फरहान अख्तरच्या आगामी 'जी ले जरा' या चित्रपटात कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. अमिताभ बच्चनची कारकीर्द उजवळणारे मनमोहन देसाई, 23 पैकी 15 चित्रपट ब्लॉकबस्टर बनवणार निर्माता
  2. सिद्धार्थ मल्होत्राने नवीन पोस्टरसह 'योद्धा' चित्रपटाच्या ट्रेलरची वाढवली उत्कंठा
  3. सामंथाची फिल्म इंडस्ट्रीत 14 वर्षे, समकालीन नयनताराने दिल्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.