ETV Bharat / entertainment

'जुग जुग जिओ 2'च्या सीक्वेलमध्ये वरुण धवनबरोबर दिसणार टायगर श्रॉफ.... - tiger shroff - TIGER SHROFF

Tiger Shroff and Varun Dhawan : 'जुग जुग जिओ 2'चा सीक्वेल सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये वरुण धवनबरोबर टायगर श्रॉफ प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे.

Tiger Shroff and Varun Dhawan
टायगर श्रॉफ आणि वरुण धवन (वरुण धवन आणि टायगर श्रॉफ (IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 7:01 PM IST

मुंबई - Tiger Shroff and Varun Dhawan : अभिनेता वरुण धवन, कियारा अडवाणी, अनिल कपूर आणि नीतू कपूर स्टारर फॅमिली ड्रामा चित्रपट 'जुग जुग जिओ'च्या सीक्वेलची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहेत. करण जोहर निर्मित 'जुग जुग जियो' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता 'जुग जुग जिओ 2' आणखी मजेदार बनवण्याची तयारी सुरू आहे. या चित्रपटाबाबत असं बोललं जात आहे की, यावेळी अभिनेता टायगर श्रॉफ या चित्रपटात कॉमेडीचा टच टाकताना दिसणार आहे. रिपोर्ट्सनुसार टायगर श्रॉफ 'जुग जुग जिओ 2' मध्ये एन्ट्री करणार असल्याचं समजत आहे. 'जुग जुग जिओ 2' चित्रपटाद्वारे वरुण आणि टायगर श्रॉफ चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसतील.

'जुग जुग जिओ'चा सीक्वेल : वरुण आणि टायगर पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 'जुग जुग जिओ 2' या चित्रपटाचं दिग्दर्शन राज मेहता करणार आहे. या चित्रपटाची गोष्टही त्यांनीच लिहिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'जुग जुग जिओ 2' हा चित्रपट पुढच्या वर्षी 2025 मध्ये प्रदर्शित होईल. तर 'जुग जुग जिओ' चित्रपट 24 जून, 2022 रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि वायकॉम18 स्टुडिओजनं केली होती.

टायगर श्रॉफ आणि अक्षय कुमार वर्कफ्रंट : टायगर श्रॉफ शेवटी अक्षय कुमारबरोबर 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात ॲक्शन करताना दिसला होता. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. आता टायगर रोहित शेट्टी दिग्दर्शित 'सिंघम अगेन' या चित्रपटात अजय देवगणबरोबर दिसणार आहे. वरुण धवनबद्दल सांगायचं झालं तर, तो अभिनेत्री जान्हवी कपूरबरोबर 'बवाल' या चित्रपटात दिसला होता. वरुणच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये 'सिटाडेल: हनी बनी', 'स्त्री 2', 'बेबी जॉन',' एक्कीस' आणि' सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हे चित्रपट आहेत. सध्या वरुण धवन वडील झाल्याचा आनंद लुटत आहे. वरुणची पत्नी नताशा दलालनं 3 जून रोजी मुलीला जन्म दिला.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस ओटीटी 3'चा नवीन होस्ट अनिल कपूरचा फर्स्ट लूक रिलीज - anil kapoor first look
  2. 'मुंज्या'मध्ये कटप्पा उर्फ सत्यराजचे समर्पण आणि प्रतिभा पाहून शर्वरी वाघ झाली आश्चर्यचकित - Sharwari Vagh
  3. अर्जुन कपूरनं मलायकाबरोबर विभक्त होण्याच्या अफवांदरम्यान केला धक्कादायक फोटो शेअर - arjun kapoor

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.