मुंबई - The Family Man 3 : मनोज बाजपेयीची मुख्य भूमिका असलेली 'द फॅमिली मॅन' ही सर्वात आवडती मालिका आहे. दुसऱ्या सीझनलाही मिळालेल्या अफाट यशानंतर प्रेक्षक यांच्या तिसऱ्या भागाची प्रतीक्षा करत होते. सर्व चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे, कारण मनोज बाजपेयीने 'द फॅमिली मॅन सीझन 3' चे शूटिंग सुरू केलं आहे. प्राईम व्हिडिओने सोशल मीडियावर तिसऱ्या सीझनचं शूटिंग सुरू झाल्याची घोषणा केली आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामणी या मालिकेत प्रवेश करत आहे.
प्राइम व्हिडिओने मनोज बाजपेयीला टॅग करत 'द फॅमिली मॅन' सीझन 3 च्या शूटिंगची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी इंस्टाग्रामवर क्लॅपबोर्ड आणि मनोज बाजपेयीसह टीमचे फोटो शेअर केले आहेत. निर्मात्यांनी शेअर केलेला पहिला फोटो क्लॅपबोर्डचा आहे. पुढील फोटोमध्ये, मनोज बाजपेयी शोचे दिग्दर्शक राज आणि डीके यांच्याबरोबर पोझ देताना दिसतील. हा फोटो शेअर करताना निर्मात्यांनी त्याला कॅप्शन दिले, "TFM3W? आम्ही शूटिंग सुरू केलं."
अभिनेत्री प्रियामणीने इंस्टाग्रामवर 'द फॅमिली मॅन' सीझन 3 चा क्लॅपबोर्डही शेअर केला आहे. 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री प्रियामणीने कॅप्शनमध्ये हात जोडून इमोजीसह निर्मात्यांचे आभार व्यक्त केले आहेत. पोस्टवर कमेंट करताना अमेझॉनने लिहिले आहे, 'लोणावळ्यात काय घडले ते वेळेनुसार कळेल!'
मनोज बाजपेयी पुन्हा एकदा श्रीकांत तिवारीच्या भूमिकेत दिसणार आहे. प्रियामणी (सुचित्रा तिवारी), शारीब हाश्मी (जेके तळपदे), अश्लेषा ठाकूर (धृती तिवारी) यांच्यासह अनेक मूळ कलाकार तिसऱ्या सीझनमध्ये त्यांच्या आधीच्या भूमिकेसह परतणार आहेत.
मनोज बाजपेयीची भूमिका असलेल्या 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या दोन्ही सीझन्सना उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. या मालिकेत मनोजने अंडर कव्हर एजंट श्रीकांत तिवारीची भूमिका साकारली होती आणि त्यांच्या सहकारी जे के तळपदेची, भूमिका शरीब हाश्मी ने साकारली होती. या भूमिकेसाठी शरीब हाश्मीचे खूप कौतुक झाले. या दोन्ही भूमिका पॉप्युलर तर झाल्याच परंतु प्रियामणीने श्रीकांत तिवारीच्या बायकोची भूमिका केली होती. या भूमिकेनंतर प्रियामणीही पुन्हा एकदा फॉर्मात आली आणि तिलाही हिंदीतील मोठे प्रोजेक्ट्स मिळू लागले. उदा. शाहरुख खानचा 'जवान', अजय देवगणचा 'मैदान' वगैरे. आता मनोज बाजपेयी च्या 'द फॅमिली मॅन'चा तिसरा सिझन येऊ घातला असून या सीझनचेही दिग्दर्शन राज आणि डिके यांनी केले आहे.
हेही वाचा -