ETV Bharat / entertainment

'बजरंगी भाईजान 2' ची स्क्रिप्ट तयार, सलमान दुबईहून परतताच सुरू होईल तयारी - Bajrangi Bhaijaan 2 - BAJRANGI BHAIJAAN 2

Bajrangi Bhaijaan 2 : सलमान खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे 'बजरंगी भाईजान 2' ची स्क्रिप्ट जवळपास तयार झाली आहे. सध्या सलमान दुबईत असून भारतात परतल्यानंतर त्याच्यासमोर ही स्क्रिप्ट सादर केली जाणार आहे.

Bajrangi Bhaijaan 2
बजरंगी भाईजान 2
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 20, 2024, 9:51 AM IST

मुंबई - Bajrangi Bhaijaan 2 : सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर तर होताच पण सीमेच्या पलीकडील चाहत्यांच्याही पसंतीस उतरला होता. या चित्रपटातील पात्रांचा प्रेक्षकांवर कायमस्वरुपी प्रभाव पडला आणि अभिनयापासून संगीत, कथानकापर्यंत हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक मैलाचा दगड ठरला होता. या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा बऱ्याच वर्षापासून सुरू असताना सलमानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी मिळाली आहे.

लेटेस्ट अपडेटनुसार, 'बजरंगी भाईजान 2' ची स्क्रिप्ट पूर्ण झाली आहे. ही कथा आता सलमानसमोर सादर केली जाणार आहे. सलमानचा मेव्हणा आयुष शर्माची भूमिका असलेल्या आगामी 'रुस्लान' चित्रपटाचे निर्माते के.के. राधामोहन यांनी अलीकडेच एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये ही उत्कंठावर्धक बातमी उघड केली. 'बजरंगी भाईजान'च्या सिक्वेलची स्क्रिप्ट फायनल झाल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

निर्माता राधामोहन यांनी 'बजरंगी भाईजान 2' चित्रपटाची कथा एसएस राजामौलीचे वडील आणि प्रसिद्ध लेखक व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्याकडून लिहून घेतली आहे. आता या स्क्रिप्टला अंतिम स्वरुप देण्यासाठी ही कथा सलमानला ऐकवली जाणार आहे. या चित्रपटाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे.

2015 मध्ये 'बजरंगी भाईजान' हा चित्रपट रिलीज झाला होता. दहा वर्षानंतर सलमान लवकरच चित्रपटाच्या सिक्वेलची स्क्रिप्ट वाचणार आहे. सलमानला स्क्रिप्ट सादर करण्यासाठी निर्माते योग्य वेळेची वाट पाहत आहेत. स्क्रिप्ट जवळपास लिहून संपल्यामुळे आता या चित्रपटाला सलमानच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. हर्षाली मल्होत्रा हिने साकारलेली मुन्नी हे पात्र सीक्वेलमध्ये पुनरागमन करणार का नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मुख्य भूमिकेत असलेली करीना कपूर खान यामध्ये पुनरागमन करेल की वेगळी अभिनेत्री तिची जागा घेईल हे सांगणे देखील खूप घाईचे असेल.

रविवारी त्याच्या घराबाहेर गोळीबाराची घटना घडल्यानंतर पहिल्यांदाच सलमान भारताबाहेर गेला आहे. सध्या तो दुबईत असून तो भारतात परतल्यावर 'बजरंगी भाईजान 2' चित्रपटाविषयी बोलणी सुरू केली जाईल. कामाच्या आघाडीवर, एआर मुरुगादास यांच्या दिग्दर्शनाखाली 'सिकंदर' या चित्रपटात सलमान काम करत आहे. करण जोहरच्या आगामी 'बुल' या चित्रपटातही तो काम करणार असल्याची एक चर्चा आहे.

हेही वाचा -

  1. 'वॉर 2'च्या मुंबईतील सेटवर फ्रेंच कॉन्सुल जनरलने घेतली हृतिक रोशनची भेट, 'आदरातिथ्याबद्दल' मानले आभार - Hrithik Roshan
  2. बॉलिवूड पदार्पणाच्या 'महाराजा' चित्रपटाच्या रिलीजपूर्वी जुनैद खानच्या 'एक दिन' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण - Junaid Khan
  3. आदिल हुसैनची 'कबीर सिंग'वर कडवट टीका, संदीप रेड्डी वंगाच्या टीकेनंतरही हुसैन आपल्या मतावर ठाम - Sandeep Reddy Vanga

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.