ETV Bharat / entertainment

'लाइट्स, कॅमेरा आणि हा आला सिकंदर', चित्रपटाच्या सेटवर दिसली सलमान खानची झलक - Salman Khan Sikandar - SALMAN KHAN SIKANDAR

Salman Khan Sikandar : 'सिकंदर' चित्रपटाच्या निर्मात्यांनी नुकतीच चित्रपटाच्या सेटवरील एक झलक शेअर केली आहे. यामुळे या चित्रपटात सलमान खानला पाहण्यासाठी आतुर असलेल्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Sikandar
सिकंदर चित्रपटाच्या सेटवरील झलक (Nadiadwalagrandson Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 2:49 PM IST

मुंबई - Salman Khan Sikandar : सुपरस्टार सलमान खान त्याच्या आगामी 'सिकंदर' चित्रपटातून चाहत्यांना प्रेक्षकांना भारावून टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी गेल्या गुरुवारपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. निर्मात्यांनी सेटवरील 'मुहूर्त शॉट'ची झलकही शेअर केली आहे. आता त्यानं चित्रपटाच्या सेटवरून आणखी एक झलक शेअर केली आहे. यातून चित्रपटातील सलमान खानचा लूक पाहण्याची उत्सुकता वाढली आहे.

आज 28 जून रोज, नाडियादवाला ग्रँडसन्सने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर सिकंदरच्या सेटवरून सलमान खानची एक झलक सादर केली आहे. त्यांनी सलमान खानच्या आयकॉनिक ब्रेसलेटबरोबरचं पोस्टर पेअर केलं आहे. या पोस्टरला निर्मात्यांनी कॅप्शन दिले आहे, "लाइट्स, कॅमेरा आणि हा आला सिकंदर." सिकंदरचं दिग्दर्शन एआर मुरुगादास आणि साजिद नाडियादवाला यांनी केले आहे. 2025 च्या ईदला थिएटरमध्ये रिलीज होईल.

साजिद नाडियादवालाची पत्नी वर्धा नाडियाडवालाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'सिकंदर'च्या सेटवरील फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत वर्धा हसत हसत ए.आर. मुरुगादास यांच्याबरोबर 'मुहूर्त शॉट' असे शब्द असलेले क्लॅपरबोर्ड हातात धरून दिसत आहे.

'सिकंदर'चे दिग्दर्शन एआर मुरुगदास यांनी केले आहे. नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट निर्मित, 'सिकंदर'मध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. सलमान खान अभिनीत या चित्रपटाचे शूटिंग पोर्तुगाल आणि इतर युरोपीय देशांमध्ये होणार आहे. याशिवाय काही भाग मोठ्या बजेटमध्ये भारतात शूट केले जाणार आहेत. हा अ‍ॅक्शन-पॅक्ड एक्स्ट्राव्हॅगान्झा 2025 च्या ईद वीकेंडला रिलीज होणार आहे.

'सिकंदर' चित्रपट कधी होईल रिलीज : 'सिकंदर' हा चित्रपट सलमान खानच्या डायहार्ट चाहत्यांसाठी ईदची भेट असेल. हा चित्रपट 2025मध्ये ईदच्या मुहूर्तावर जगभर प्रदर्शित होणार आहे. यात त्याचा सर्वात अनोखा लूक 'सिकंदर'मध्ये पाहायला मिळणार आहे. सलमान अखेरचा 'टायगर 3' या चित्रपटामध्ये कतरिना कैफबरोबर दिसला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता 'सिकंदर' हा चित्रपट प्रेक्षकांवर किती जादू चालवणार हे येत्या काळात दिसून येईल. या चित्रपटासाठी दिग्दर्शक ए आर मुरुगोदास यांनी खूप मेहनत घेतली आहे. दरम्यान, सलमान खानच्या आगामी प्रोजेक्ट्स बद्दल बोलायचं झालं तर तो पुढं 'दबंग 4' , 'टायगर वर्सेस पठान', 'किक 2', 'इन्शाअल्लाह', 'नो एंट्री 2' आणि 'पवन पुत्र भाईजान' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. सलमान खान स्टारर 'सिकंदर'च्या शूटिंगला सुरुवात, सेटवरील फोटो व्हायरल - SALMAN KHAN
  2. 'सिकंदर'च्या अ‍ॅक्शन सीनसाठी सलमान खान सज्ज, या दिवसापासून सुरू करणार शूटिंग - Salman Khan
  3. "आशाताई गाते हे मला ठाऊक नव्हतं", मंगेशकरांनी सांगितल्या हृदयाजवळच्या आठवणी - Swaraswamini Asha

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.