ETV Bharat / entertainment

'कल्की 2898 एडी' टीमने शेअर केला 'इटली डायरीज'मधील दिशा आणि प्रभासचा फोटो - कल्की शूटिंग शेड्यूल

Kalki 2898 AD team Italy Diaries : 'कल्की 2898 एडी' चित्रपटाच्या पुढील शूटिंग शेड्यूलसाठी चित्रपटाची टीम बुधवारी इटलीला रवाना झाली. चित्रपटाच्या टीमने प्रभास आणि दिशा पटानीचा विमानातील फोटो शेअर केला आहे. तसेच दुसऱ्या फोटोत संपूर्ण टीम विमानाच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या फोटोत दिसत आहे.

Kalki 2898 AD team
कल्की 2898 एडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 3:23 PM IST

मुंबई - Kalki 2898 AD team Italy Diaries : 'सालार'च्या पहिल्या भागानंतर 'बाहुबली' स्टार प्रभासचे चाहते त्याच्या आगामी दोन महत्त्वकांक्षी चित्रपटांची प्रतीक्षा करत आहेत. 'सालार भाग २: शौर्यंगा पर्वम' आणि 'कल्की २८९८ एडी' हे दोन चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होत आहेत. नाग अश्विन दिग्दर्शित 'कल्की २८९८ एडी' चे शूटिंग शेड्यूल इटलीमध्ये होणार आहे. यासाठी संपूर्ण क्रू आणि कलाकार यासाठी बुधवारी रवना झालेत. चित्रपटाच्या टीमने अपडेट शेअर करताना आपल्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर दिशा पटानी आणि प्रभासचे खासगी विमानातून प्रवास करतानाचे फोटो शेअर केले आहेत.

नाग अश्विनचा 'कल्की 2898 एडी' या चित्रपटाकडून चाहत्यांना खूप जास्त अपेक्षा आहेत. या सायन्स फिक्शनच्या निर्मात्यांनी आता शूटिंगचे अपडेट देताना इटली डायरीतील डार्लिंग प्रभासचा आणि दिशा पटानीचा फोटो शेअर केला आहे. ( चाहते प्रभासला आवडीने डार्लिंग असे म्हणतात )

फोटोत दिशा काळ्या रंगाची हुडी परिधान करून प्रभासचा फोटो क्लिक करताना असून तिचा चेहरा यामध्ये अस्पष्ट दिसत आहे. प्रभास वळून दिशाकडे फोटोसाठी पोज देताना दिसत आहे. प्रभासने ग्रे कलरचा टी-शर्ट आणि काळी टोपी आणि तपकिरी गॉगल घातलेला दिसत आहे.

इटलीला जाणाऱ्या विमानात जाण्यापूर्वी 'कल्की' टीमने एक ग्रुप फोटोही शेअर केलाय. यामध्ये संपूर्ण टीम फोटोसाठी पोज देत असून मागे उभे असलेले खासगी जेट विमान दिसत आहे.

दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन आणि अशा दिग्गज कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. 'कल्की 2898 एडी' चित्रपट 9 मे रोजी तेलुगू, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे. याशिवाय प्रभासकडे 'सालार पार्ट २: शौर्यंगा पर्वम' चित्रपटही आहे. पहिल्या भागाला प्रेक्षक आणि समीक्षकांनी प्रशंसा केल्यानंतर या चित्रपटाकडेही प्रेक्षकांचे डोळे लागून राहिले आहेत.

हेही वाचा -

  1. रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवी मंदिरात कुटुंबासह घेतलं दर्शन
  2. आदिल खान दुर्राणीनं 'बिग बॉस 12' फेम स्पर्धकाशी केलं लग्न
  3. 'कॉस्मेटिक सर्जरीपासून सावध रहा' : महिला दिनाच्या आधी 'आशिकी' फेम अनु अग्रवालचा खास संदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.