ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - The Great Indian Kapil Show - THE GREAT INDIAN KAPIL SHOW

The Great Indian Kapil Show: कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' पुन्हा धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. अलीकडेच कपिल शर्मानं त्याच्या टीमबरोबर शोच्या दुसऱ्या सीझनची मोठी घोषणा केली आहे.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो (द ग्रेट इंडियन कपिल शो सीजन 2 (Show Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 14, 2024, 2:44 PM IST

मुंबई -The Great Indian Kapil Show 2 : "कॉमेडी किंग' कपिल शर्मानं नेटफ्लिक्सवर प्रसारित होणाऱ्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या दुसऱ्या सीझनची मोठी घोषणा केली आहे. नेटफ्लिक्स इंडियानं अलीकडेच शोचा प्रीमियर व्हिडिओ रिलीज केला आहे. यात कपिल शर्मा त्याच्या मजेदार शोसह पुनरागमन करताना दिसत आहे. प्रोमोमध्ये आलिया भट्ट, जान्हवी कपूर, सैफ अली खान, करण जोहर, रोहित शर्मा हे स्टार्स पाहुणे म्हणून आल्याचं दिसत आहेत. तसेच कपिल शर्मा, सुनील ग्रोव्हर, किकू शारदा, राजीव ठाकूर, कृष्णा अभिषेक आणि अर्चना पूरण सिंग आता प्रेक्षकांना हसविण्यासाठी सज्ज झाले आहेत.

'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा प्रोमो रिलीज : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सीझन 2मध्ये प्रेक्षकांना खूप काही नवीन पाहायला मिळणार आहे. सैफ अली खान, ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर, आलिया भट्ट, आणि करण जोहर यांसारख्या सेलिब्रिटींना पूर्णपणे नवीन पद्धतीनं जाणून घेण्याची संधी आता प्रेक्षकांना मिळेल. आता अनेकजण या शोच्या प्रदर्शनाची वाट पाहात आहेत. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या पहिल्या सीझनमध्ये सुपरस्टार रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहीण रिद्धिमा साहनी, कार्तिक आर्यन, आमिर खान दिलजीत दोसांझ, परिणीती चोप्रा आणि इतर स्टार्स पाहुणे म्हणून आले होते. आता सीझन 2 मध्ये कपिल शर्माची टीम नवीन पाहुण्यांबरोबर प्रेक्षकांचं मनोरंजन करेल.

चाहते शो पाहण्यासाठी आतुर : कपिल शर्माच्या शोचे असंख्य चाहते आहेत. आता ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. शेअर केलेल्या प्रोमोच्या पोस्टमध्ये आता अनेकजण कमेंट्स करून शोबद्दल आतुर असल्याचं सांगत आहेत. एका चाहत्यांनं या पोस्टवर लिहिलं, 'पहिला सीझन हा खूप धमाकेदार होता, आता वेळी देखील कमाल होणार आहे.' दुसऱ्या एकानं यावर लिहिलं, 'चंदू चायवाला या शोमध्ये पाहिजे.' आणखी एकानं यावर लिहिलं, 'आता हा शो आणखी मजेदार होणार आहे.' 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा दुसरा सीझन 21 सप्टेंबरपासून स्ट्रीम होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.