ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये रणबीर कपूरनं केला खुलासा ; 'या' कारणामुळे वडील ऋषी कपूरनं फटकारलं! - the Great Indian Kapil Show - THE GREAT INDIAN KAPIL SHOW

The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये रणबीर कपूरनं काही खुलासे केले आहेत. यावेळी त्यानं सांगितलं की, तो वडील ऋषी कपूरला खूप घाबरत होता.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 31, 2024, 12:13 PM IST

Updated : Mar 31, 2024, 12:59 PM IST

मुंबई- The Great Indian Kapil Show : कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' सुरू झाला आहे. हा ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर स्ट्रीम झाला आहे. या शोच्या पहिल्या एपिसोडमध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूर आणि बहिण रिद्धिमा कपूर साहनी यांनी हजेरी लावली होती. कपिलच्या शोमध्ये यावेळी नीतू कपूर, रणबीर कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी यांनी मिळून अनेक गुपिते एकमेकांसमोर उघड केली. या तिघांनी मिळून कपिलच्या शोमध्ये खूप धमाल केली. या शोचा पहिला एपिसोड शनिवारी 30 मार्च रोजी प्रदर्शित झाला. हा पहिलाच एपिसोड खूप धमाकेदार होता.

रणबीरला ऋषी कपूरनं फटकारलं : शो दरम्यान कपिल शर्मानं नीतू कपूरला विचारले की, तुमच्या कोणत्या सवयी दोन्ही मुलांना आहेत. यावर नीतूनं उत्तर दिले की, ते माझ्यासारखे शांत आहेत. पण त्यांचे वडील ऋषी यांनी त्यांना खूप चांगले संस्कार दिले आहे. त्यांना लोकांचा आदर करायला, पैसा आणि वेळेची कदर करायला शिकवले आहे. यानंतर रणबीर कपूर सांगतो की, तो त्याच्या वडिलांना खूप घाबरत होता. त्यानं म्हटलं ''जर माझ्याकडे वडिलांनी वटारून पाहिलं तर मी रडत होतो. माझे वडील ज्यांच्यावर प्रेम करायचे त्यांनाच टोमणे मारायचे.'' कपिलनं पुढे विचारले की, रणबीरला त्याच्या वडिलांनी कधी मारले आहे का? यावर त्यानं उत्तर दिलं, ''एक प्रसंग सांगतो जेव्हा त्यांनी मला जोरदार फटकारलं होतं. माझे वडील खूप धार्मिक होते. एके दिवशी मी आरके स्टुडिओत गेलो तिथे माझे वडील पूजा करत होते. मी माझे बूट न ​​काढता आत गेलो. हे पाहून वडिलांनी मला टपली मारली होती.''

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

रणबीर कपूरचे आगामी चित्रपट : वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, रणबीर कपूर शेवटी 'ॲनिमल' या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट 1 डिसेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. आता पुढं तो 'रामायण' या चित्रपटात साऊथ अभिनेत्री साई पल्लवीबरोबर दिसणार आहे. याशिवाय तो आलिया भट्ट आणि विकी कौशलबरोबर 'लव्ह ॲन्ड वॉर' दिसेल. तसेच 'ब्रह्मास्त्र पार्ट 2' आणि 'ब्रह्मास्त्र पार्ट 3'मध्ये तो झळकणार आहे.

हेही वाचा :

  1. 'देसी गर्ल' प्रियांकाच्या पती निकनं सर्वांना शांत राहण्याची केली सूचना, मुंबई विमानतळावरील व्हिडिओ व्हायरल - priyanka chopra
  2. लंडनमधील होप गालामध्ये आलिया भट्टनं गायलं सुंदर गाणं, व्हिडिओ व्हायरल - Alia bhatt
  3. हनी सिंगनं लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना दिला 'गांजा' न पिण्याचा सल्ला - Yo yo honey singh

Last Updated : Mar 31, 2024, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.