ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सोनाक्षी सिन्हानं तिच्या लग्नाबद्दल केलं भाष्य, जाणून घ्या सविस्तर - THE GREAT INDIAN KAPIL SHARMA SHOW - THE GREAT INDIAN KAPIL SHARMA SHOW

The Great Indian Kapil Show : 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधील आगामी एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये सोनाक्षी सिन्हा तिच्या लग्नाबद्दल विधान करताना दिसत आहे.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो (सोनाक्षी सिन्हा(Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 5:35 PM IST

मुंबई - The Great Indian Kapil Show : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'हिरामंडी' या वेब सीरीजमधील संपूर्ण स्टार कास्ट 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या आगामी भागात दिसणार आहे. आज 8 मे रोजी नेटफ्लिक्स इंडियानं या शोमधील प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये सोनाक्षी सिन्हा, मनीषा कोईराला, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, शर्मीन सहगल आणि संजीदा शेख दिसत आहेत. या प्रोमोमध्ये कपिल सोनाक्षीला तिच्या लग्नाबद्दल चिडवताना दिसत आहे. 'हिरामंडी'ची संपूर्ण कास्ट शोचा आनंद घेत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. आता या शोचा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल होत आहे.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' प्रोमो रिलीज : व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये कपिल सोनाक्षीला सांगतो की, आता आलिया भट्ट आणि कियारा अडवाणीचं लग्न झालं आहे. यावर ती म्हणते "तुम्ही जखमेवर मीठ चोळत आहात, मला लग्न करायचं आहे हे तुला माहीत आहे." सोनाक्षीच्या या वक्तव्यावर सगळेच हसतात. 'हिरामंडी'च्या शूटिंगबद्दल बोलताना रिचा चड्ढानं सवाल केला की सर्वात जास्त कोणी रिटेक घेतला यावर सोनाक्षीनं सांगितलं की, तिचे 12 पेक्षा जास्त रिटेक नाहीत. त्यानंतर रिचानं सांगितले की, तिचा जास्तीत जास्त 99 रिटेक करण्याचा रेकॉर्ड आहे. याशिवाय मनीषा कोईरालानं देखील सेटवरचा तिचा अनुभव कसा होता याबद्दल सांगत तिनं म्हटलं, "सेटवर प्रत्येक सीनपूर्वी नेहमी अस्वस्थतेची भावना असायची." यानंतर बाकी तिथे उपस्थित असलेली स्टार कास्ट सेटवरचे त्यांचे अनुभव सांगतात.

भन्साळी यांनी 'हीरामंडी'वर 18 वर्षांपासून केलं होतं काम : 'हीरामंडी' स्टारकास्टबरोबरचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा हा एपिसोड लवकरच प्रसारित होणार आहे. सोनाक्षी सिन्हा 'हिरामंडी' या वेब सीरीजमध्ये रेहाना अप्पांची भूमिका साकारत आहे. या वेब सीरीजचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळीनं केलंय. संजय लीला भन्साळी 'हीरामंडी'वर 18 वर्षांपासून काम केलं होतं. याशिवाय या वेब सीरीजमध्ये मेल कास्टमध्ये शेखर सुमन, फरदीन खान, अध्यायन सुमन, ताहा शहा हे कलाकार दिसले आहेत. वेब सीरीजच्या कहाणीबद्दल सांगायचं झालं तर, ही वेब सीरीज ब्रिटीश काळात भारतातील लाहोरमधील गणिकांच्या आयुष्यावर आधारित आहे. ही वेब सीरीज 1 मे रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

हेही वाचा :

  1. 'लव्ह यू फॉरएव्हर' म्हणत, वरुण धवनने पत्नी नताशा दलालला दिल्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Varun Dhawan
  2. नुपूर शिखरेनं पत्नी आयरा खानला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, केली पोस्ट शेअर - nupur shikhare wishes wife ira khan
  3. जान्हवी कपूर आणि राजकुमार राव अभिनीत 'मिस्टर अ‍ॅन्ड मिसेस माही'मधील फर्स्ट लूक रिलीज - janhvi kapoor and rajkummar rao

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.