ETV Bharat / entertainment

मिस वर्ल्ड २०२४ च्या मंचावर संजय लीला भन्साळींच्या 'हीरामंडी'चे पहिले गाणे होणार लॉन्च - भन्साळींच्या हीरामंडीचे पहिले गाणे

संजय लीला भन्साळी यांची बहुचर्चित 'हीरामंडी' या वेब सिरीजची प्रतीक्षा लोक करत असतानाच यातील पहिले गाणे आज लॉन्च केले जाणार आहे. विशेष म्हणजे, भारतात होत असलेल्या मिस वर्ल्डच्या जागतिक मंचावरुन हे गाणे लॉन्च होईल. 'सकल बन' असे शीर्षक असलेले हे गाणे नेत्रदीपिक असेल, अशी अपेक्षा प्रेक्षक बाळगून आहेत.

The first song of Hiramandi
'हीरामंडी'चे पहिले गाणे होणार लॉन्च
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 1:38 PM IST

मुंबई - सोनाक्षी सिन्हा, रिचा चढ्ढा, अदिती राव हैदरी, मनीषा कोईराला, शर्मीन सेगल आणि संजीदा शेख यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'हीरामंडी: द डायमंड बझार' या आगामी वेब सीरिजचे निर्माते मालिकेचे प्रसारण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता या मालिकेतील पहिले गाणे प्रेक्षकांसमोर मिस वर्ल्डच्या जागतिक मंचावर लॉन्च केले जाणार आहे. भन्साळी प्रॉडक्शनच्या नवीन म्युझिक लेबल, 'भन्साळी म्युझिक'चा हा पहिलाच ट्रॅक असणार आहे. 'सकल बन' असे शीर्षक असलेलं हे गीत आकर्षक आणि नेत्रदीपक असेल याची खात्री प्रेक्षक बाळगून आहेत.

'हम दिल दे चुके सनम', 'ब्लॅक', 'राम-लीला', 'बाजीराव मस्तानी', 'पद्मावत', 'देवदास', 'सावरिया' आणि 'गंगूबाई काठियावाडी' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमुळे संजय लीला भन्साळी हे नाव एक कलात्मक प्रतिभा असलेला अष्टपैलू दिग्दर्शक म्हणून नावारुपास आले आहे. अलिकडेच त्यांनी संगीताच्या जगात प्रवेश केला आणि गुरुवारी स्वतःचे 'भन्साळी म्युझिक' हे संगीत लेबल लाँच केले.

इंस्टाग्रामवर भन्साळी प्रॉडक्शनने ही बातमी आपल्या चाहत्यांना कळवताना लिहिले, "संगीतामुळे मला खूप आनंद आणि शांती मिळते. संगीत माझ्या अस्तित्वाचा एक अविभाज्य भाग आहे. मी आता माझे स्वतःचे संगीत लेबल "भंसाली म्युझिक" लाँच करत आहे. संगीत ऐकताना एक आध्यात्मिक अनुभूती मला मिळत असते हाच अनुभव मिळावा यासाठी मी प्रेक्षकांना शुभेच्छा देतो."

'भन्साळी म्युझिक'सह संजय लीला भन्साळी आपल्या सर्जनशीलतेसह संगीत क्षेत्रात आपल्या विस्तार करणार आहेत. आगामी काळात प्रतिभावान संगीतकार आणि कलाकारांना घेऊन उत्तम संगीत आणि अल्बमची निर्मिती केली जाणार आहे. भन्साळी यांच्या सिनेमॅटिक निर्मितीने प्रेक्षकांना सातत्याने मंत्रमुग्ध केले आहे, त्यांच्या चित्रपटाच्या कथनात संगीताने अविभाज्य भूमिका बजावली आहे. 'बाजीराव मस्तानी'मधील 'दीवानी मस्तानी'च्या भव्यतेपासून ते 'ब्लॅक'च्या धमाल गाण्यांपर्यंत, 'लाल इश्क'चे सौंदर्य असो किंवा 'पद्मावत' चित्रपटातील 'घूमर'चे रंग असो की देवदासमधील 'डोला रे' पर्यंतची गाणी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेण्यात यशस्वी झाली आहेत.

तब्बल 28 वर्षांनंतर, मिस वर्ल्डची आंतरराष्ट्रीय फिनाले स्पर्धा भारतात होत आहे. या मंचावरुन भन्साळींचे नवं गाणं लॉन्च होत असल्यानं हा एक ऐसिहासिक क्षण असणार आहे. हा कार्यक्रम आज (९ मार्च) मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. भारतातील दर्शकांसाठी, मिस वर्ल्ड फिनाले सोनी LIV वर थेट प्रक्षेपित केली जाईल.

हेही वाचा -

  1. संजय लीला भन्साळीच्या 'हीरामंडी'चा फर्स्ट लूक प्रदर्शित; पाहा व्हिडिओ
  2. भन्साळींच्या 'हीरामंडी'मध्ये झळकणार मनिषा कोईराला आणि मुमताज? फोटो व्हायरल
  3. 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर बिग बॉस फेम यूट्यूबर एल्विश यादवविरुद्ध गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.