मुंबई - अभिनेता आणि समाजसेवक सोनू सूदने त्याच्या आगामी 'फतेह' चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला असून त्याचे चाहते यासाठी खूप उत्सुक होते. या दमदार अॅक्शन फिल्म मध्ये जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार असून सोनू सूद या चित्रपटद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.
![The first poster of Fateh released](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-03-2024/damsel_1503newsroom_1710495946_241.jpg)
'फतेह'च पोस्टर नक्कीच खास आहे कारण प्रेक्षकांना काहीतरी नवीन आणि उत्तम गोष्ट बघायला मिळणार यात शंका नाही. सोनू या चित्रपटात काहीतरी वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे असं देखील कळतंय. सायबर क्राइम थ्रिलर असलेल्या चित्रपटाचे लेखन आणि निर्मितीही सोनूने केली आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरनंतर आता उद्या सकाळी याचा टिझर प्रदर्शित केला जाणार आहे.
![The first poster of Fateh released](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/15-03-2024/sonu_1503newsroom_1710495946_930.jpg)
‘फतेह’ हा एक अॅक्शन-पॅक्ड रोमांचक चित्रपट आहे. या चित्रपटासाठी हॉलिवूडचे स्टंटमन काम करत असल्यामुळे चित्रपटाबाबत आधीच चर्चा रंगल्याचे चित्र सगळीकडे पाहायला मिळतं. नुकतेच त्याने या चित्रपटाचे सॅन फ्रॅन्सिस्को येथील शुटिंग शेड्यूल पूर्ण केलं. इन्स्टाग्रामवर त्याने 'फतेह'च्या सेटवरील काही फोटो शेअर केले आहेत. शुटिंग पूर्ण झाल्याचा संदेशही त्याने यामधून चाहत्यांना दिला आहे.
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोत सोनू सूद क्लॅप बोर्डसह स्क्रिप्ट वाचताना दिसत असून टीमसोबत फोटोंना पोजही देताना दिसतोय. त्याच्या या फोटोवर प्रतिक्रियांसह चाहत्यांनीही इमोजींचा वर्षाव केलाय. शिवाय त्याला भरपूर प्रतिक्रियाही मिळतायत.
आता सॅन फ्रान्सिस्को मधलं शूटिंग पूर्ण झाल्याने 'फतेह' टीममध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. कोविड साथीच्या काळात लोकांनी अनुभवलेल्या सायबर गुन्ह्याच्या सत्य कथेवर आधारित 'फतेह' चित्रपटाची कथा आहे.
सोनू सूद दिग्दर्शित 'फतेह' चित्रपटात सोनू सूदसह जॅकलीन फर्नांडिस, शिवज्योती राजपूत आणि विजय राज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, रिसर्च टीम, अॅक्शन आणि कोरिओग्राफीसाठी हॉलिवूडची टीम काम करतेय. यासाठी सर्वोत्कृष्ट लोकांची निवड करण्यात आली आहे. सोनू सूदसाठी हा एक महत्त्वाकांक्षी चित्रपट असल्याचं मानलं जात आहे.
सोनू सूदने कोविडच्या काळात लोकांसाठी भरपूर समाजसेवेचं काम केलं होतं. प्रवासी कामगारांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. यासाठी तो लोकांच्या मदतीसाठी जाण्यास सदैव तत्पर असायचा. मात्र त्याच्या नावाचा वापर करुन लोकांची फसवणूक करणारेही काही महाभाग त्याच्या निदर्शनास आले. खोटी कर्ज देणं, सोनू सूदला भेटण्याचे आश्वासन देणे ,असे प्रकार उघडकीस येत गेले. तेव्हा सोनूला त्याला जाणवलं की सायबर क्राईम हे देशातील सर्वात मोठे फसवणुकीचं जाळं आहे. याच अनुभवावर आधारित 'फतेह' चित्रपटाची कल्पना त्याला सुचली आणि त्यावर त्याने अहोरात्र मेहनत केली आहे. 'फतेह' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येईल, अशी माहिती सोनू सूदने दिलीय.
हेही वाचा -