ETV Bharat / entertainment

बच्चन कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं साजरा केला 'होलिका दहन' उत्सव - Bachchan family Holika Dahan - BACHCHAN FAMILY HOLIKA DAHAN

Bachchan family Holika Dahan : बच्चन कुटुंबानं पारंपरिक पद्धतीनं होलिका दहनाचा उत्सव साजरा केला. यासाठी त्यांनी होलिकेचं पूजन केलं आणि कुटुंबासह दहन करुन होळीच्या शुभेच्छा दिल्या. याचे काही फोटो नव्या नवेली नंदा आणि अभिषेक बच्चननं शेअर केले आहेत.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 25, 2024, 1:06 PM IST

मुंबई - Bachchan family Holika Dahan : होळीच्या निमित्तानं वाईट विचारांचं दहन करण्याचं प्रतीक म्हणून होलिका दहनाचा उत्सव पारंपरिक पद्धतीनं साजरा केला जातो. हा उत्सव देशभर साजरा होत असताना बच्चन कुटुंबासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी देखील यानिमित्तानं पूजा केली. रविवारी पार पडलेल्या या सणाचे अनेक फोटो मेगास्टार अमिताभ बच्चन यांची नात नव्या नंदा हिने शेअर केले आहेत. यामध्ये बच्चन कुटुंब होलिका दहन सोहळ्यात सहभागी होताना दिसले.

नव्या नंदाने शेअर केलेल्या एका फोटोत तिचा मामू अभिषेक बच्चन होलिकामध्ये जळणार असलेल्या राक्षसाचे बारकाईने निरीक्षण करत असल्याचं दिसतंय. नव्यानं शेअर केलेल्या होलिका दहन अल्बममध्ये तिची आजी आणि ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन देखील दिसत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या देखील एका फोटोत पार्श्वभूमीत दिसली होती.यामध्ये नव्या नवेली अभिषेला होळीचे रंग लावताना दिसत आहे. संपूर्ण बच्चन कुटुंबाने या प्रसंगी पारंपरिक पोशाख परिधान केला आहे. नव्यानं आपल्या या पोस्टला "होलिका दहन," असं हिंदीमध्ये कॅप्शन दिले आहे.

अभिषेकने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर होलिका दहन पूजेचे काही फोटोही शेअर केले आहेत. होलिका होलिका सर्व वाईटांना जाळून टाकू दे, असं म्हणत त्यानं होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. होलिका दहन हा प्रतीकात्मकतेने भरलेला सण आहे. हा सण विधी होलिकेच्या दंतकथेमध्येही पाहायला मिळतो.

हिंदू पौराणिक कथेनुसार एकेकाळी हिरण्यकशिपू नावाचा एक राक्षस राजा होता. त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णू भक्त असल्यानं तो त्याच्या विरोधात होता. त्यामुळे हिरण्यकशिपूने आपली बहीण होलिकाला प्रल्हादला मारण्यासाठी सांगितले होते. पण होलिकानं जेव्हा पेटत्या अग्नीत प्रल्हादला ओढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये तिचा आगात भस्मसात होऊन मृत्यू झाला. तर, भगवान विष्णूच्या आशीर्वादाने प्रल्हाद सुरक्षित बाहेर आला. दुष्ट विचारांचं दहन करावं, सर्व वाईट विचार या होळीत भस्मसात व्हावेत याचं प्रतीक म्हणून होलिका दहनाचा उत्सव साजरा केला जातो.

हेही वाचा -

  1. पहिल्या मुलाच्या स्वागतानंतरच्या पहिल्या पोस्टमध्ये अनुष्का शर्मानं दिल्या होळीच्या शुभेच्छा - Anushka Sharma Holi Wishes
  2. बाबा सिद्दीकीच्या इफ्तार पार्टीत सेलेब्रिटींची मांदियाळी, सलमान-इमरानपासून प्रिती झिंटापर्यंत तारे तारकांची हजेरी - Baba Siddiqui Iftar Party
  3. एक्स पतीच्या निकाहानंतर राखी सावंतनं शेअर केला वधू वरांच्या पोशाखातील माकडांचा फोटो - Rakhi sawant and Adil khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.