मुंबई - Alia Bhatt : अलीकडेच मेट गालामध्ये तिच्या पारंपारिक लुकनं खळबळ माजवणारी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान 'द अकादमी'नं आलियाच्या अभिनयाचा विशेष उल्लेख करत 'कलंक'मधील 'घर मोरे परदेसिया' या प्रसिद्ध गाण्याचा व्हिडिओ आपल्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, "कलंक' चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया'वर आलिया भट्टचा परफॉर्मन्स. वैशाली म्हाडे आणि श्रेया घोषाल यांनी गायलेलं गाणं. अभिषेक वर्मन दिग्दर्शित वरुण धवन, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. या गाण्याला प्रीतम चक्रवर्ती यांनी संगीतबद्ध केलंय. गाण्याचे बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिली आहेत."
आलिया भट्टचा व्हिडिओ व्हायरल : आलिया भट्टचा शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आता या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करून आपल्या प्रतिक्रिया देत आहे. एका चाहत्यानं पोस्टवर लिहिलं, "हिंदी चित्रपटसृष्टीतील आतापर्यंतचा सर्वात सुंदर चेहरा." दुसऱ्या एका यूजरनं लिहिलं की, "दीवानी मस्तानीनंतर आता 'घर मोर परदेसिया'ला हे सुंदर आहे. श्रेया घोषाल यांना सलाम." आणखी एकानं लिहिलं, "श्रेया घोषालच्या आवाजात सुंदर जादू आहे आणि आलियाचा डान्स पण सुंदर." काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.
आलिया भट्टचं वर्क फ्रंट : आलिया भट्टच्या आगामी प्रोजेक्टबद्दल बोलायचं झालं तर ती वासन बाला दिग्दर्शित 'जिगरा' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि आलियनं केली आहे. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर यावर्षी 27 सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. करण स्पाय युनिव्हर्सच्या जगात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज आहे. संध्या या चित्रपटावर काम सुरू आहे. 'जिगरा'मध्ये आलियाबरोबर वेदांग रैना दिसणार आहे. या चित्रपट तो आलियाच्या भावाच्या भूमिकेत दिसेल. याशिवाय तिच्याकडे संजय लीला भन्साळीचा 'लव्ह अँड वॉर' हा चित्रपटही आहे, ज्यात रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत.
हेही वाचा :