ETV Bharat / entertainment

20 वर्षांनी चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाला विजयचा ‘घिल्ली’, चित्रपटाची कमाई ऐकून तुम्हीही व्हाल चकित - Thalapathy Vijay - THALAPATHY VIJAY

Thalapathy Vijay : साऊथ सुपरस्टार थलपथी विजय आणि त्रिशा कृष्णन स्टारर चित्रपट 2004 मध्ये बनलेला 'घिल्ली' हा चित्रपट अलिलडेच पुन्हा प्रदर्शित झाला. तसंच या चित्रपटानं एका आठवड्यात 20 कोटींहून अधिक व्यवसाय करून नवीन विक्रम केला आहे.

Thalapathy Vijay
थलपथी विजय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 26, 2024, 10:52 PM IST

मुंबई Thalapathy Vijay : बॉलिवूडमध्ये प्रदर्शित होणारे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचा डंका वाजवताना आपण नेहमी ऐकत असतो. अलिकडेच रिलीज झालेल्या चित्रपटाबद्दल बोलायचं तर त्यात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' आणि अजय देवगणचा स्पोर्ट्स बायोग्राफिकल चित्रपट 'मैदान' यांचा समावेश आहे. यातला मैदान कमाईत पिछाडीवर राहिला. गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. मात्र, साऊथची फिल्म इंडस्ट्री, त्यातील सुपरस्टार्स आणि त्यांना फॉलो करणारे चाहते यांची गोष्टच वेगळी आहे.

साऊथचा सुपरस्टार थलपती विजय याचा 'घिल्ली' हा चित्रपट 20 वर्षानंतर पुन्हा एकदा केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही रिलीज करण्यात आलाय, आणि त्याला सर्वत्र बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटानं 20 कोटींची कमाई केली आहे.

'घिल्ली'नं घडवला इतिहास : आता 'घिल्ली' हा भारतात पुन्हा प्रदर्शित होणारा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या यादीत 'टायटॅनिक 3D' या हॉलिवूड चित्रपटाच्या री-रिलीज (2012) दरम्यान झालेल्या कमाईच्या तुलनेत 'घिल्ली' मागे पडला आहे. परंतु त्यानंतर 2013 मध्ये शोले 3D मध्ये प्रदर्शित झाला होता. शोले 3D ने पहिल्या वीकेंडमध्ये 6 कोटींची कमाई केली होती. या कमाईलाही मागे टाकत थलपती विजयच्या चित्रपटानं कमाईचा नवा विक्रम केला आहे.

'घिल्ली' चित्रपटानं पहिल्या आठवड्यातच जगभरातील बॉक्स ऑफिसवर 20 कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 15 कोटी रुपये आणि परदेशात 5.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

तमिळनाडूमध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण असल्यानं चित्रपटाला 6 दिवसांचा आठवडा मिळाला, तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला डंका वाजवला आहे. या चित्रपटानं पहिल्याच दिवशी जागतिक स्तरावर 10 कोटींहून अधिकचा व्यवसाय केलाय.

'घिल्ली'ची कमाई? : 20 वर्षांपूर्वी 8 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला 'घिल्ली' हा चित्रपट धारणीने दिग्दर्शित केला होता, ज्यानं त्यावेळी 50 कोटी रुपये कमवले होते. या चित्रपटातील 'उप्पडी पोडू' हे गाणे आजही खूप लोकप्रिय आहे.

हेही वाचा -

  1. महिलांच्या हक्कांविषयी जागृत करणारी प्रियांका चोप्रा जोनास निर्मित डॉक्युमेंटरी, "WOMB"! - Priyanka Chopra
  2. "मला वाद घालायचा नाही", म्हणत अरबाज खाननं दिलं मलायका अरोराला उत्तर - Arbaaz Khan on Malaika Arora
  3. कृष्णा अभिषेकशी असलेल्या वादानंतरही गोविंदानं आरती सिंगच्या लग्नाला लावली हजेरी - Krushna Abhishek

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.