चेन्नई - Daniel Balaji Passes Away : तमिळ अभिनेता डॅनियल बालाजी याचं वयाच्या 48 व्या वर्षी शुक्रवारी रात्री 29 मार्च रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. 'वेट्टय्याडू विलायाडू' मधील 'अमुधन' आणि 'वाडा चेन्नई' मधील 'थंबी' सारख्या व्यक्तीरेखांसाठी त्याला साऊथ इंडियात ओळखलं जातं. उत्कृष्ट अभिनयाबरोबरच त्याची पडद्यावरील उपस्थितीही प्रेक्षकांना प्रशंसनीय वाटायची. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर डॅनियलला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते, तेथे त्याचा मृत्यू झाला.
डॅनियल बालाजी याच्यावर शनिवारी, 30 मार्च रोजी पुरसाईवलकम येथील त्याच्या निवासस्थानी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्याच्या अनपेक्षित निधनाने तमिळ चित्रपटसृष्टीला आणि त्यांच्या चाहत्यांना खूप दु:ख झाले आहे.
लोकप्रिय तमिळ टीव्ही मालिका 'सोप ऑपेरा चिठी' मध्ये डॅनियल ही व्यक्तिरेखा साकारून बालाजीने टेलिव्हिजनमधील अभिनयाचा प्रवास सुरू केला. रुपेरी पडद्यावरही येण्याचं स्वप्न पूर्ण करत त्यानं 2002 मध्ये तमिळ रोमँटिक ड्रामा चित्रपट 'एप्रिल मधाथिल'मधून पदार्पण केलं होतं.
सुरुवातीला, डॅनियल बालाजी यानं कमल हासनच्या भारतीय ऐतिहासिक ड्रामा असलेल्या, 'मरुधनायागम'च्या सेटवर युनिट प्रॉडक्शन मॅनेजर म्हणून काम केलं. चिठ्ठी या दूरचित्रवाणी मालिकेतील त्याच्या भूमिकेमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याचा रुपेरी पडद्याकडे वळण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानं कमल हासनची भूमिका असलेल्या 'वेट्टैयाडू विलाय्याडू' चित्रपटात 'अमुधन' ही खलनायकाची व्यक्तीरेखा साकारली.
बालाजीने मल्याळम सिनेमात मामूट्टी यांची भूमिका अलेल्या 'ब्लॅक' चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यानं मोहनलालच्या 'भगवान' आणि मामूट्टीच्या 'डॅडी कूल'मध्ये खलनायकी भूमिका केल्या होत्या.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, बालाजीने संस्मरणीय अभिनयाचं सादरीकरण करुन स्वतःला सिद्ध केलं. अभिनेता सुर्याच्या 'काखा काखा' या कॉप ड्रामा चित्रपटातील तपास अधिकारी, धनुषच्या अॅक्शन-पॅक्ड 'वादा चेन्नई'मधील गँगस्टर भास्करन आणि व्यंकटेशच्या तेलुगु अॅक्शन थ्रिलर 'घर्षणा'मधील एक पोलिस अधिकारी यासारखी पात्रे त्यानं साकारली.
त्याच्या अभिनयाच्या पलीकडे जाऊन बालाजी हा आवाडी येथील मंदिराच्या बांधकामात सहभागी असलेला एक धर्मनिष्ठ व्यक्ती म्हणून ओळखला जात होता.
हेही वाचा -
- 'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर आज स्ट्रीमिंग होईल, पाहा प्रोमो - the great indian kapil show
- चोप्रा भगिनींच्या प्रेमाला उधाण! मन्नाराच्या बर्थडे पार्टीला निक जोनाससह प्रियांकाची हजेरी - Mannara Chopra Birthday Bash
- मलायकाचा मुलगा अरहानच्या वाढदिवसाला अरबाज नवी पत्नी शशुरा खानसह हजर - ARHAAN KHAN BIRTHDAY PARTY