ETV Bharat / entertainment

इयत्ता 7 वीत शिकवला जात होता तमन्ना भाटियाचा धडा, संतप्त पालकांची तक्रार - Tamannaah Bhatia lesson

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 28, 2024, 5:26 PM IST

Tamannaah Bhatia lesson : बेंगळुरूमधील एका शाळेत तमन्ना भाटियाचा धडा शिकवल्यानं खळबळ उडाली आहे. ही बाब गांभीर्यानं घेत पालकांनी तक्रार दाखल केली आहे.

Tamannaah Bhatia
तमन्ना भाटिया ((Etv Bharat))

मुंबई - Tamannaah Bhatia lesson : अभिनेत्री तमन्ना भाटिया भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने हिंदीसह साऊथ इंडियन भाषेमध्ये अनेक चित्रपट केले असून ती तिच्या बोल्ड सीन्ससाठीही प्रसिद्ध आहे. तमन्ना तिच्या मागील प्रोजेक्ट लस्ट स्टोरीजमध्ये खूप इंटिमेट सीन देताना दिसली होती. आता तमन्ना एका विचित्र गोष्टीमुळे प्रकाशझोतात आली आहे. बेंगळुरूमधील एका शाळेत तिच्यावरील एक धडा शिकवला जात होता. यामध्ये तिच्याबद्दलची माहिती देण्यात आली होती.

हे प्रकरण बेंगळुरूमधील हेब्बल येथील सिंधी हायस्कूलमधील आहे. या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे पालक हे सर्व पाहून संतापले आहेत. या प्रकरणामुळे पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार पालकांना या गोष्टीची माहिती कळाली आणि त्यांनी शाळेत गोंधळ घातला.

मिळालेल्या बातमीनुसार तमन्ना भाटियाचा धडा 7 व्या वर्गात शिकवला जात होता. वर्ग 7 च्या पुस्तकातील धड्याचं शीर्षक होतं "विभाजनानंतरचे जीवन: सिंधमधील स्थलांतर, समुदाय आणि संघर्ष." या धड्याचा विषय 1947 ते 1962 या कालावधीशी संबंधित आहे. या प्रकरणात, अभिनेत्रीबद्दल माहिती दिली जात होती. यामध्ये अभिनेत्रीच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला जात होता.

यावर विद्यार्थ्यांच्या पालकांचे म्हणणे आहे की, मुलांना इतर संस्कृतीची जाणीव करून देण्यास आमची हरकत नाही, आमची तक्रार अभिनेत्रीच्या वर्णनावर आहे, ते इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी योग्य नाही. या संपूर्ण प्रकरणावर तमन्ना भाटियाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

तमन्ना भाटियाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं एका तामिळ चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. जॉन अब्राहमबरोबर ती 'वेदा'मध्ये दिसणार आहे. तसेच ती 'स्त्री 2'मधील एका गाण्यात कॅमिओ करताना दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. याशिवाय पुढं ती 'ओडेला 2', 'अरमानाई 4', 'कथु करुप्पु', आणि 'येन एंद्रु काधल एनबेन' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत.

हेही वाचा -

  1. तमन्ना भाटिया आणि राशी खन्ना स्टारर 'अरमानाई 4' होईल हिंदीमध्ये रिलीज - tamannaah bhatia
  2. Vedaa teaser released : जॉन अब्राहम, शर्वरी वाघ, तमन्ना भाटिया स्टारर 'वेदा'चा टीझर रिलीज
  3. अभिनेत्री तमन्ना भाटियाला आयपीएलच्या अवैध स्ट्रीमिंग प्रकरणी सायबर पोलिसांचं समन्स - tamannaah bhatia

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.