मुंबई -TABU HOLLYWOOD PROJECTS : 'क्रू' चित्रपटात अतिशय वेगळी भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्री तब्बू हॉलिवूड मालिका 'ड्यून: प्रोफेसी'च्या कलाकारांमध्ये सामील झाली आहे. यामुळे तिच्या आजवरच्या कारकिर्दीत ग्लोबल अभिनेत्री म्हणून मिरवण्याची तिला आणखी एक संधी चालून आली आहे. या सायन्स फिक्शन शोमध्ये तब्बू प्रमुख भूमिका साकारत आहे. हॉलिवूड स्टार अभिनेता टिमोथी चालमेट आणि अभिनेत्री झेंडया यांच्या 2021 मध्ये रिलीज झालेल्या डेनिस विलेनेव दिग्दर्शित 'ड्यून' चित्रपटाचा प्रिक्वेल असणार आहे.
'सिस्टरहुड ऑफ ड्यून' या ब्रेन हर्बट आणि केवीन जे अँडरसन यांनी लिहिलेल्या पुस्तकावरुन प्रेरणा घेत 'ड्यून - द सिस्टरहुड' या मालिकेची घोषणा 2019 मध्ये करण्यात आली. 'ड्युन: प्रोफेसी' या मालिकेमध्ये, पॉल अट्रेड्सच्या उदयाच्या 10,000 वर्षांपूर्वीचे कथानक दाखवण्यात येणार आहे. यामध्ये अभिनेत्री तब्बू सम्राटाबरोबर रोमान्स करणारी मजबूत, हुशार आणि सुंदर व्यक्ती असलेल्या सिस्टर फ्रान्सिस्काची भूमिका साकारणार आहे. तिच्या राजवाड्यात परतण्याने अनेकांना हादरा बसतो अशी ही वेगळी आणि संस्मरणीय ठरु शकेल अशी भूमिका तब्बूच्या पदरात पडली आहे.
अभिनेत्री तब्बू हिला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत, ती एमिली वॉटसन, ऑलिव्हिया विल्यम्स, ट्रॅव्हिस फिमेल आणि इतरांसह स्टार-स्टडेड कलाकारांसह स्क्रीन शेअर करणार आहे. 2023 मध्ये लीड कलाकारामध्ये बदल आणि रीबूटसह निर्मितीचा हा एक खडतर प्रवास असणार आहे. एलिसन शाप्कर आता या शोचं नेतृत्व करत आहे.
बॉलिवूड आणि पाश्चिमात्य दोन्ही सिनेमांमध्ये तिच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या तब्बूने 2006 मध्ये मीरा नायरच्या 'द नेमसेक' आणि 2012 मध्ये आंग ली दिग्दर्शित 'लाईफ ऑफ पाई' या सिनेमाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली होती.
बॉलिवूडमध्येही तब्बू परत एकदा अजय देवगणबरोबर 'औरों में कहां दम था' या संगीतमय रोमँटिक ड्रामा चित्रपटासाठी काम करणार आहे. अजय आणि तब्बू यांच्या जोडीच्या केमेस्ट्रीचा यशस्वी इतिहास आहे आणि जुलैमध्ये रिलीज होणाऱ्या या आगामी चित्रपटात त्यांची केमिस्ट्री पुन्हा एकदा चमकेल अशी त्यांच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
हेही वाचा -