मुंबई - Phir Aayi Hasseen Dillruba: अभिनेत्री तापसी पन्नू ,विक्रांत मॅसी आणि सनी कौशल स्टारर 'फिर आयी हसीन दिलरुबा' हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. 'हसीन दिलरुबा'चा हा दुसरा भाग आहे. 'हसीन दिलरुबा' हा जुलै 2021 मध्ये रिलीज झाला होता. पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. त्यात विक्रांत, तापसी पन्नू आणि अभिनेता हर्षवर्धन राणे मुख्य भूमिकेत दिसले होते. आता 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये राणी उर्फ तापसी पन्नूचा प्रेमाविषयी असलेला वेडेपणा पाहायला मिळणार आहे.
'फिर आयी हसीन दिलरुबा'मधील नवीन पोस्टर रिलीज : दरम्यान सोशल मीडियावर नेटफ्लिक्सनं दोन पोस्टर रिलीज केले आहेत. पहिल्या पोस्टरमध्ये विक्रांत मॅसी, तापसी पन्नू आणि सनी कौशल एका छत्रीखाली पावसात भिजताना दिसत आहेत. तसेच त्याच्या शरीरावर रक्ताचं थेंब आहेत. दरम्यान, सनी एका हातात गुलाबाचा पुष्पगुच्छ असून त्यानं तापसीचा हात धरलेला आहे. याशिवाय विक्रांतनं या पोस्टमध्ये एका हातात छत्री पकडलेली दिसत आहे. आणखी दुसऱ्या एका पोस्टरमध्ये सनी कौशलनं हातात छत्री पकडलेली असून तापसीनं त्याचा हात पकडलेला आहे. याशिवाय विक्रांतचा देखील तापसीचा हात धरलेला आहे.
'फिर आयी हसीन दिलरुबा' टीझर : 'फिर आयी हसीन दिलरुबा'मध्ये जिमी शेरगिलही दिसणार आहे. या चित्रपटाची कहाणी कनिका ढिल्लन यांनी लिहिली आहे. यापूर्वी 'फिर आयी हसीन दिलरुबा' चित्रपटाचं टीझर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आलं होतं. यामध्ये पोस्टमध्ये इन्स्टाग्रामवर, कॅप्शनमध्ये लिहिलं होतं, "रानीच्या कहानीमध्ये प्रेम आणि वेडेपणा, दोन्ही बाकी आहे. 'फिर आयी हसीन दिलरुबा' लवकरच येत आहे, फक्त नेटफ्लिक्सवर!" यानंतर या पोस्टवर अनेक चाहत्यांनी या चित्रपटाबद्दल उत्सुक असल्याची प्रतिक्रिया दिली होती. आनंद एल राय यांचे कलर यलो प्रॉडक्शन आणि भूषण कुमारची टी-सीरीजनं हा चित्रपट तयार केला आहे.
हेही वाचा :