ETV Bharat / entertainment

'देसी गर्ल'चा पती निक जोनसनं मुंबई कॉन्सर्टमध्ये केली धमाल; तापसी पन्नूनं शेअर केला व्हिडिओ - निक जोनस

Nick Jonas 'Jiju': लोल्लापलूझा मुंबई कॉन्सर्टमध्ये, तापसी पन्नू आणि देसी गर्ल प्रियांका चोप्राचे चाहते निक जोनसला 'जीजू जीजू' म्हणत चीअर अप करताना दिसले. या कॉन्सर्टमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nick Jonas Jiju
निक जोनस जीजू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 12:05 PM IST

मुंबई - Nick Jonas 'Jiju': 'नॅशनल जीजू' निक जोनसचे शनिवारी लोल्लापलूझा मुंबई कॉन्सर्टमध्ये भारतीय चाहत्यांनी जोरदार स्वागत केले आहेत. 27 जानेवारी शनिवारी जोनस ब्रदर्स एका मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रम दरम्यान जोनस ब्रदर्सनं आपलं एक हिट गाणं सादर केलं. केविननं निकची प्रेक्षकांसमोर 'जीजू' म्हणून ओळख करून दिली. त्यानंतर कॉन्सर्टमध्ये पोहोचलेल्या लोकांनी 'जीजू जीजू' म्हणून त्याला प्रोत्साहित केले. यावर निकनं सर्वांना 'लव्ह यू ऑल' म्हटलं. त्याच्या कॉन्सर्टमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओवर यूजर्स कमेंट्स करून त्याचे कौतुक करत आहेत.

जोनस ब्रदर्सच्या कॉन्सर्टमध्ये तापसी हजर : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूही निक जोनसच्या कॉन्सर्टमध्ये हजर होती. तिनं तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर कॉन्सर्टचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'जीजाजी स्टेजवर आहेत.' निकनं आपल्या मुंबई कॉन्सर्टची सुरुवात मजेशीर पद्धतीने केली. 2018 मध्ये प्रियांकासोबतच्या लग्नाच्या जुन्या आठवणींना उजाळा देताना त्यानं म्हटलं, 'भारतातील हा माझा पहिलाच परफॉर्मन्स आहे.'' तेव्हा प्रेक्षकांनी 'जीजू, जीजू' म्हणायला सुरुवात केली. तेव्हा निकनं म्हटलं, "माझा या देशाशी खूप चांगले संबंध आहेत.आमच्यासोबत असल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमची रात्र अधिक मनोरंजक करू." या कार्यक्रमात अनेकजण निकच्या परफॉर्मेंससाठी खूप आतुर होते.

निक जोनसचा परफॉर्मन्स : निकनं स्टेजवर राजासोबत 'मान मेरी जान' एक्स आफ्टरलाइफ देखील सादर केलं. हे तिघे रंगमंचावर येण्यापूर्वी प्रियांका आणि रणवीर सिंग स्टारर 'दिल धडकने दो' या चित्रपटातील 'गल्लन गुडियां'चा एक आकर्षक ट्रॅक वाजवण्यात आला होता. यानंतर 'मान मेरी जान' एक्स आफ्टरलाइफ सादर करण्यात आलं. या शोआधी निकदेखील खूप उत्साहित होता. दरम्यान काही दिवसापूर्वी प्रियांकानं निक हा भारतात कॉन्सर्टसाठी येत असल्याचं सांगितलं होतं. निकनं पहिल्यांदा भारतात स्टेजवर परर्फाम केलं आहे.

हेही वाचा :

  1. कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल, गायक राहत फतेह अली खाननं बदलला 'सूर'
  2. बिग बॉस 17 च्या फिनालेचे काउंटडाऊन सुरू, आज लागणार निकाल; पाहा कोण आहेत 'टॉप 5' मध्ये
  3. 'कंगुवा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी बॉबी देओलच्या वाढदिवसाच्यानिमित्त शेअर केला भीतीदायक फर्स्ट लुक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.