ETV Bharat / entertainment

सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी बहीण श्वेतानं सुरू केली अनोखी मोहीम - Sushant Singh Sister start Campaign - SUSHANT SINGH SISTER START CAMPAIGN

Sushant Singh Rajput Sister start Campaign : सुशांत सिंह राजपूतला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या बहिणीनं एक अनोखी मोहीम सुरू केली आहे. तिनं सुशांतच्या मृत्यूबाबत सत्य उघड करण्याचं आवाहन सीबीआयला केलं आहे.

Sushant Singh Rajput Sister start Campaign
सुशांत सिंह राजपूतची बहिणीनं सुरू केली मोहिम
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 28, 2024, 1:27 PM IST

मुंबई - Sushant Singh Rajput Sister start Campaign : अभिनेता सुशांत सिंह राजपूतची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं तिच्या भावाच्या मृत्यूनंतर अनेकदा न्यायासाठी मागणी केली आहे. आता अलीकडेच, श्वेतानं न्याय मागणीसाठी ऑनलाइन मोहीम सुरू केली आहे. यामुळे ती सोशल मीडियावर आता चर्चेत आली आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतनं जगातून कायमचा निरोप घेतला होता. मुंबईतील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये तो मृतावस्थेत आढळला होता. काही लोकांना अजूनही वाटते की सुशांतचा मृत्यू आत्महत्येनं झाला नाही. त्याच्या बहिणीनं पुन्हा एकदा सीबीआय अधिकाऱ्यांना सुशांतच्या मृत्यूबाबत शोध घेण्याची मागणी केली आहे.

सुशांतची बहीण श्वेता सिंह किर्तीनं न्यायसाठी केली ऑनलाइन मोहीम : सुशांत सिंहची बहीण श्वेता सिंह कीर्तीनं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर 'न्यायफॉरएसएसआर जन आंदोलन' (Nyay4SSRJanAndolan) ची घोषणा केली आहे. या मोहिमेचा एक भाग होण्यासाठी, श्वेतानं प्रत्येकाला त्यांच्या मनगटावर किंवा कपाळावर लाल कापड बांधल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास सांगितलं आहे. श्वेतानं सीबीआयकडे तपासाला थोडा वेग देऊन सत्य उघड करण्याची मागणी केली आहे. तिनं इंस्टाग्राम हँडलवर पोस्ट शेअर करताना लिहिलं की, "जवळपास 45 दिवसानंतर सुशांतच्या मृत्यूला 4 वर्षे पूर्ण होतील. मी सीबीआयला या प्रकरणाचा तपास जलद गतीनं करून सत्य उघड करण्यासाठीचे आवाहन करते. चला एकजुटीनं उभे राहून आपल्या मनगटावर आणि कपाळावर लाल कपडा बांधू आणि 'न्यायफॉरएसएसआर जन आंदोलन' टॅग करून मोहिमेचा भाग व्हा."

सुशांत सिंह बद्दल : सुशांत सिंहनं एकता कपूरच्या टीव्ही शो 'किस देश में है मेरा दिल' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यात त्यानं प्रीत सिंग जुनेजाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याची 'पवित्र रिश्ता'मध्ये अंकिता लोखंडेबरोबर जबरदस्त ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळाली. सुशांतनं 2010 मध्ये 'झलक दिखला जा 4' मध्येही भाग घेतला होता. तो डान्स रिॲलिटी शोचा फर्स्ट रनर अप होता. यानंतर त्यानं हिंदी चित्रपटसृष्टीत 'काय पो छे ' या चित्रपटामधून पदार्पण केलं. त्यानं बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपटामध्ये काम केलंय. त्याला खरी ओळख 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटामधून मिळाली.

हेही वाचा :

  1. राखी सावंतनं सलमान खानसाठी पीएम मोदींकडे केलं आवाहन, सर्व वर्गातील सुरक्षाची केली मागणी - rakhi sawant
  2. छत्तीसगढमध्ये लपलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई पोलिसांनी केली अटक; 40 तास केला पाठलाग - Mahadev Betting App case
  3. 'कल्की 2898 एडी' बाबत मोठं अपडेट! प्रभास स्टारर चित्रपटाला मिळाली नवी रिलीजची तारीख - Kalki 2898 Ad Update

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.