मुंबई : टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योतीनं 27 ऑक्टोबर रोजी तिचा बॉयफ्रेंड सुमित सूरीबरोबर लग्न केलंय. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट येथील अहाना रिसॉर्टमध्ये कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत या जोडप्यानं सात फेरे घेतले. आता सुरभीच्या लग्नातील काही सुंदर फोटोही इंस्टाग्रामवर समोर आले आहेत. फोटोमध्ये, लग्नाच्या पोशाखात सुरभी आणि सुमित खूपच आकर्षक दिसत आहेत. सुरभीनं सुमित सुरीबरोबरचे लग्नामधील फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, 'शुभ विवाह 27/10/2024.' याशिवाय तिनं सुंदर हार्ट आणि इनफिनिटीचं चिन्ह देखील पोस्ट केले आहे.
सुरभी ज्योतीचं झालं लग्न : सुरभी ज्योतीनं तिच्या लग्नासाठी किरमिजी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता. यावर तिनं नेकलेस, मांगटिका आणि चुडा घालून तिचा लूक पूर्ण केला. दुसरीकडे सुमितबद्दल सांगायचं झालं तर त्यानं त्याच्या या विशेष दिवसासाठी पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. यावर त्यानं बेज रंगाची पगडी घातली होती. लग्नापूर्वी 27 तारखेला दुपारी दोघांचा हळदी समारंभ पार पडला. शनिवारी त्यांचा मेहंदी सोहळा झाला, ज्यामध्ये सुरभीनं पंजाबी कुडीचा पेहराव करून चाहत्यांची मनं जिंकली. सुरभी आणि सुमितचं लग्न राजस्थानमध्ये मार्च महिन्यात होणार होतं, मात्र राजस्थानमधील लग्न स्थळ ठरू शकले नाही. यानंतर दोघांनी जिम कॉर्बेटची निवड केली.
सुरभी ज्योतीला दिल्या चाहत्यांनी शुभेच्छा : जिम कॉर्बेट येथील निसर्गाच्या सानिध्यात सात फेरे घेतल्यानंतर आता अनेकजण सोशल मीडियाच्या माध्यामातून सुरभी ज्योती आणि सुमित सूरीला लग्नाबद्दल शुभेच्छा देताना दिसत आहेत. एका चाहत्यांनं या पोस्टच्या कमेंट विभागात लिहिलं, 'खूप सुंदर जोडपे आहे.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा.' आणखी एकानं लिहिलं, 'सुरभीचा लूक खूप सुंदर आहे.' याशिवाय अनेक टीव्ही स्टार देखील सुरभीला तिच्या लग्नाबद्दल शुभेच्छा देत आहेत. सुरभी ज्योतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'कबूल है', 'नागिन ', इश्कबाज, 'तन्हाईयाँ' आणि 'कोई लौट के आया है' अशा अनेक मालिकेत काम केलंय.
हेही वाचा :