ETV Bharat / entertainment

वयाच्या 69व्या वर्षी रेखानं शिल्पा शेट्टीबरोबर केला धमाकेदार डान्स, व्हिडिओ व्हायरल... - Super dance Rekha video - SUPER DANCE REKHA VIDEO

Rekha and Shilpa Shetty Dance Video : शिल्पा शेट्टी आणि ज्येष्ठ अभिनेत्री रेखाचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आता हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडत आहे.

Rekha and Shilpa Shetty Dance Video
रेखा आणि शिल्पा शेट्टीचा डान्स व्हिडिओ (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 8, 2024, 12:32 PM IST

मुंबई - Rekha and Shilpa Shetty Dance Video : वय हा फक्त एक आकडा असतो असे अनेकजण म्हणतात. बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखाला नाचताना अनेकांनी पाहिलं आहे. वयाच्या 69व्या वर्षीय रेखा आज पण खूप सुंदर डान्स करते. आता तिचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये ती 48व्या वर्षीय शिल्पा शेट्टीबरोबर 1978 मध्ये आलेल्या 'मुकद्दर का सिकंदर' या चित्रपटातील 'सलाम ए इश्क मेरी जान' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. दोघींनाही डान्स करताना पाहून आता चाहते देखील खुश झाले आहेत, या व्हिडिओच्या कमेंट विभागात अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

रेखा आणि शिल्पा शेट्टी कुंद्राचा डान्स : हा डान्स व्हिडीओ एका रिॲलिटी शोचा आहे, यामध्ये आधी शिल्पा शेट्टी डान्स करते आणि मग रेखा येऊन तिला साथ देते. वयाच्या बाबतीत या दोघी आजही 20 आणि 30 वर्षाच्या वाटतात. रेखा 69 वर्षांची आहे, तर शिल्पा शेट्टी 48 वर्षांची आहे. यांच्या डान्स व्हिडिओवर चाहते आता कौतुकांचा वर्षाव करताना दिसत आहेत. अनेकजण रेखाला सुपर डान्सर म्हणताना दिसत आहेत. शिल्पा ही या वयात देखील खूप फिट आहे. ती आपल्या दिवसाची सुरुवात योगानं करते. अनेकदा ती योगा करतानाचे आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करत असते.

वर्कफ्रंट : शिल्पा शेट्टी ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिला इंस्टाग्रामवर 32.3 मिलियन लोक फॉलो करतात. दरम्यान या दोघींच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रेखानं अभिनयाच्या दुनियेपासून अंतर ठेवले आहे पण शिल्पा शेट्टी अभिनयाच्या दुनियेत सक्रिय आहे. नुकतीच ती रोहित शेट्टीच्या 'इंडियन पोलिस फोर्स' या वेबसीरीजमध्ये दिसली होती. यामध्ये तिनं जबरदस्त ॲक्शन सीन्स केले. या वेब सीरीजमध्ये तिच्याबरोबर सिद्धार्थ मल्होत्रा देखील होता. आता पुढं ती कन्नडा चित्रपट 'केडी - द डेव्हिल' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर संजय दत्त, ध्रुव सर्जा, रविचंद्रन आणि नोरा फतेही दिसणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.