मुंबई - Karan Johar and Varun Dhawan : चित्रपट निर्माता करण जोहर एकामागून एक आपले चित्रपट आणि प्रोजेक्ट्स लॉन्च करत आहे. करण जोहरनं व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं 'लव्ह स्टोरीज' वेब सीरीज ओटीटीवर रिलीज केली होती. आता तो सिद्धार्थ मल्होत्राच्या 'योद्धा' चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 'योद्धा' हा चित्रपट 15 मार्चला प्रदर्शित होणार आहे. याआधी करण जोहरनं पुन्हा एकदा एका धमाकेदार प्रोजेक्टची घोषणा केली आहे. आज 22 फेब्रुवारीला करण जोहरनं त्याच्या चाहत्यांना पुन्हा एकदा एक नवीन भेट दिली आहे. करण जोहरनं वरुण धवन आणि जान्हवीबरोबर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाची घोषणा केली आहे.
करण आणि वरुण शेअर केली पोस्ट : करणनं 21 फेब्रुवारीला त्याच्या एका पोस्टमध्ये ही माहिती दिली होती की तो 22 फेब्रुवारीला काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. यानंतर अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रिया देत त्याच्या नवीन प्रोजेक्टबद्दलची विचारपूस केली होती. करण जोहर आणि वरुण धवन यांनी आपापल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाचा शीर्षक टीझर रिलीज केला आहे. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' या चित्रपटाची निर्मिती करण जोहर, हिरू यश जोहर, शशांक खेतान आणि अपूर्व मेहता करणार आहेत. या चित्रपटात वरुण धवन सनी संस्कारीच्या भूमिकेत तर जान्हवी कपूर तुलसी कुमारीच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर दिसणार आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' दिग्दर्शन कोण करणार ? : दिग्दर्शक शशांक खेतान हा चित्रपट बनवत आहेत. या चित्रपटाचे लेखन शशांक खेतान यांनी केलंय. 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'साठी प्रेक्षकांना एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट 18 एप्रिल 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. याआधी शशांक खेताननं वरुण धवनबरोबर 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' हे चित्रपट बनवले आहेत. याशिवाय जान्हवीचा पहिला चित्रपट 'धडक' देखील शशांकनं दिग्दर्शित केला होता. आता अनेकजण वरुण स्टारर 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' चित्रपटाची वाट पाहत असल्याचं कमेंट्स करून पोस्टवर म्हणत आहेत.
हेही वाचा :