मुंबई- Dhirajlal Shah Demise : हिंदी चित्रपटसृष्टीसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचे प्रसिद्ध निर्माते धीरज लाल शाह यांचं निधन झालं आहे. सोमवारी म्हणजेच 11 मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. एका मुलाखतीत धीरज लाल शाह यांचा भाऊ हसमुख शाह यांनी सांगितलं की,''कोरोना झाल्यापासून ते खूप आजारी राहू लागले होते. धीरज लाल शाह यांना फुफ्फुसाचा त्रास सूरू झाला होता. कोरोनामुळे त्याच्या फुफ्फुसावर आणि हृदयावर गंभीर परिणाम झाला होता. त्यानंतर शरीराच्या इतर अनेक अवयवांनी काम करणे बंद केलं.''
धीरजलाल शाहाचं निधन : हसमुख शाह यांनी पुढं सांगितलं की, ''काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे त्यांना घाईघाईनं आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याच्या मूत्रपिंड आणि हृदयावरही परिणाम झाला होता. यानंतर त्याचे अनेक अवयव निकामी झाले होते. डॉक्टरांनी त्यांना वाचविण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र ते त्याचा प्राण वाचू शकले नाहीत.'' मल्टी ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचं समजत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धीरजलाल शाह यांच्या पार्थिवावर 12 मार्च रोजी मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. धीरज लाल यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्कृष्ट चित्रपट दिले आहेत.
धीरजलाल शाहा वर्कफ्रंट : दरम्यान दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी निर्मात्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं की, ''एक चांगला निर्माता असण्याबरोबरच ते एक उमदा व्यक्ती देखील होते, त्यांनी व्हिडिओच्या अद्भुत दुनियेला जन्म दिला होता. धीरज लाल शाह यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी मंजू धीरज शाह, दोन मुली शीतल पुनित गोयल आणि सपना धीरज शाह आणि मुलगा जिमित शाह आणि सून पूनम शाह हे सदस्य आहेत. दरम्यान त्याच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर धीरजलाल शाह यांनी 'द हीरो' (2003) कृष्णा (1996), गॅम्बलर (1995) आणि विजयपथ (1994) या चित्रपटांची निर्मिती केली. आता धीरज लालच्या निधनाच्या बातमीनं संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सर्व स्टार्स त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
हेही वाचा :