ETV Bharat / entertainment

सनी देओलवर फसवणूकीसह खंडणीचा आरोप, चित्रपट निर्मात्याचा धक्कादायक खुलासा - Sunny Deol - SUNNY DEOL

Sunny Deol : एका चित्रपट निर्मात्यानं सनी देओलवर फसवणूक, खंडणी आणि बनावटगिरीचं आरोप केलं आहेत. चित्रपटासाठी पैसे घेत राहिला परंतु वेळ दिला नाही, अशा प्रकारचा आरोप सनीवर करण्यात आला आहे. अद्याप याला सनीनं उत्तर दिलेलं नाही.

Sunny Deol
सनी देओल ((IMAGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 31, 2024, 11:47 AM IST

मुंबई -Sunny Deol : 'गदर 2' या चित्रपटातून 2023 मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये दमदार कमबॅक करणाऱ्या सनी देओलबाबत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक सौरव गुप्ता यानं सनी देओलवर फसवणूक, खंडणी आणि बनावटगिरी केल्याचं आरोप केलं आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना निर्मात्यानं हा खुलासा केला आहे. चित्रपटाच्या निर्मात्याचा दावा आहे की, सनी देओलनं त्याच्याकडून अ‍ॅडव्हान्स पैसे घेतलं आणि अद्याप त्याचा चित्रपट सुरू केलेला नाही.

सनी देओलवर आरोप

या संपूर्ण घटनेचं वर्णन करताना चित्रपटाच्या निर्मात्यानं सांगितलं की, 2016 मध्ये सनी आणि माझ्यामध्ये चित्रपटासाठी 4 कोटीचा एक करार झाला होता, त्यासाठी मी सनीला 1 कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स दिलं होतं, परंतु माझा चित्रपट करण्याऐवजी त्यानं त्याचा भाऊ बॉबी देओलबरोबर 'पोस्टर बॉईज' हा चित्रपट केला होता. हा चित्रपट श्रेयस तळपदेनं दिग्दर्शित केला होता. सनी देओल सातत्यानं माझ्याकडून पैसे मागत राहिला आणि आतापर्यंत मी त्याला 2.55 कोटी रुपये दिलं आहेत.

निर्मात्याच्या म्हणण्यानुसार, सनीनं सातत्यानं काही कारणं सांगत चित्रपटासाठी वेळ दिला नाही. या दरम्यान त्यानं आपल्या मुलाला लॉन्च केलं, स्वतः दुसरे चित्रपट केले मात्र त्याच्या चित्रपटासाठी तारखा दिल्या नाहीत. आधी चार कोटीचा करार झाला असताना आपली फी वाढल्याचं सांगत 8 कोटी केली. शिवाय त्यात 2 कोटी नफ्याचीही मागणी केली. सनीला काम करुन पैसे घ्यायचे नाही तर आमच्याकडून फक्त पैसे उकळायचे आहेत. त्याला वाटतं की आम्ही छोटे लोक आहोत आम्ही त्याचं काहीच बिघडू शकत नाही. आम्ही त्याला पैसे देऊन आठ वर्षे झाली आहेत. या सगळ्या दरम्यान आमचं खूप मोठं नुकसान झालंय. आमचा फोनही तो उचलत नाही. आम्ही चित्रपट सुरू करायचा म्हणून अनेक ठिकाणी खर्च केला, स्टुडिओही बुक केला होता. आमचं सनी देओलमुळं खूप मोठं नुकसान झाल्याचंही निर्माता सौरव गुप्तानं सांगितलं. पत्रकार परिषद घेऊन त्यानं हे आरोप केले आहेत. या आरोपांना अद्यापही सनी देओलकडून कोणतंही उत्तर आलेलं नाही.

आपण जर सनी देओलच्या वर्क फ्रंटबद्दलकडे पाहिलं, तर तो त्याच्या आगामी 'सफर' आणि 'लाहोर 1947' या चित्रपटांसाठी चर्चेत आहे. 'लाहोर 1947' ची निर्मिती आमिर खान करत असून या चित्रपटात सनीबरोबर प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा -

  1. लवकरच प्रदर्शित होणारे 10 कॉमेडी चित्रपट तुम्हाला करतील टेन्शन फ्री, पाहा रिलीज तारखा - Top ten Coming Soon Comedy Movie
  2. विद्यार्थी मित्रांनो मोबाईलचा नाद सोडा अन् संगीतात रममाण व्हा; 'लिटिल चॅम्पचा' बालमित्रांना सल्ला - Geet Bagde Advice To Child
  3. 'मिर्झापूर सीझन 3' च्या रिलीजची तारीख ठरली, जाणून घ्या ही क्राईम थ्रिलर सीरिज कधी आणि कुठे पहायची - MIRZAPUR SEASON 3

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.