ETV Bharat / entertainment

सुनील शेट्टीनं जावई केएल राहुलला 32व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, केला फोटो शेअर - KL Rahul 32nd Birthday - KL RAHUL 32ND BIRTHDAY

KL Rahul 32nd Birthday : सुनील शेट्टीनं जावई केएल राहुल याला त्याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. आता केएलला अनेकजण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत.

KL Rahul 32nd Birthday
केएल राहुलचा 32वा वाढदिवस
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 11:22 AM IST

मुंबई - KL Rahul 32nd Birthday : आज 18 एप्रिल रोजी सुनील शेट्टीचा जावई आणि भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुलचा 32 वा वाढदिवस आहे. या विशेष प्रसंगी सुनील शेट्टीनं केएल राहुलबरोबरचा एक सुंदर फोटो शेअर करून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीनं देखील केएल राहुलला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. गुरुवारी सकाळी सुनील शेट्टीनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, 'ते म्हणतात की आपल्या आयुष्यात काय आहे. यानं काही फरक पडत नाही, परंतु आपल्या आयुष्यात कोण आहे हे महत्त्वाचं आहे. तू माझ्याबरोबर आहेस याचा मला आनंद वाटतो, कारण हे असं कनेक्शन आहे जे मी स्पष्ट करू शकत नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा राहुल. मी तुझ्यावर प्रेम करतो बेटा.'

KL Rahul 32nd Birthday
केएल राहुलचा 32वा वाढदिवस

सुनील शेट्टीनं शेअर केला फोटो : फोटोमध्ये सुनील शेट्टी आपला जावई केएल राहुल आणि अहानबरोबर सोफ्यावर बसलेले दिसत आहेत. हे तिघेही रिलॅक्स मोडमध्ये दिसत आहेत. तर दुसरीकडे अहाननं त्याच्या इंस्टाग्रामवर केएल राहुलबरोबरचा स्टायलिश लूकमधील फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं, 'हॅपी बर्थडे ब्रदर'. फोटोमध्ये दोघेही टी-शर्ट आणि निळ्या डेनिममध्ये दिसत आहे. या फोटोत दोघेही खूप सुंदर दिसत आहेत. आता अनेकजण केएल राहुलचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. केएल राहुल हा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तो अनेकदा आपल्या पत्नीबरोबर सुंदर फोटो शेअर करत असतो.

केएल राहुल आणि अथिया शेट्टीचं लग्न : दरम्यान सध्या सुनील शेट्टी एका रिॲलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहेत. दरम्यान, अहान शेट्टी लवकरच पूजा हेगडेबरोबर साजिद नाडियादवालाच्या 'सँकी' चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. सुनील शेट्टी अनेकदा आपल्या मुलाबरोबर बॉलिवूडमधील पार्ट्यामध्ये दिसतो. दरम्यान केएल राहुलनं सुनील शेट्टीची मुलागी अथिया शेट्टीबरोबर लग्न 23 जानेवारी 2023 रोजी केलं. सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्महाऊसवर अनेक बॉलिवूड कलाकार आणि क्रिकेटर्स या सुंदर समारंभात हजेरी लावली होती. हे लग्न समारंभ खूप चर्चेत होता.

हेही वाचा :

  1. 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यननं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - vidya balan
  2. शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ, रक्षकांच्या गराड्यात किंग खान विमानतळावर दिसला - पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan
  3. दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.