ETV Bharat / entertainment

'स्त्री 2'च्या सक्सेस पार्टीला श्रद्धा कपूर, राजकुमार रावसह इतर सेलिब्रिटींनी लावली हजेरी - STREE 2 - STREE 2

Stree 2 Movie: 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये बॉलिवूडमधील काही कलाकार उपस्थित होते.

Stree 2 Movie
स्त्री 2 चित्रपट ('स्त्री 2'ची सक्सेस पार्टी (ANI/ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 6:23 PM IST

मुंबई - Stree 2 Movie: बॉलिवूडमधून सर्वात मोठा ओपनिंग घेणारा 'स्त्री 2' हा हॉरर कॉमेडी चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'स्त्री 2' चित्रपटानं रुपेरी पडद्यावर दोन दिवसांत 100 कोटींचा विक्रम पार केला आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनानिमित्त 'स्त्री 2' रिलीज झाला. आज, 17 ऑगस्ट रोजी रिलीजच्या तिसऱ्या दिवशी हा चित्रपट खूप कमाई करेल असं सध्या दिसत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये खूप गर्दी होत आहे. 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी निर्माते आणि स्टारकास्टनी एक सक्सेस पार्टी आयोजित केली होती.

'स्त्री 2'च्या सक्सेस पार्टीत स्टार्सनं लावली हजेरी : 'स्त्री 2'च्या सक्सेस पार्टीमध्ये चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट आणि निर्माते, खूप खुश असल्याचे दिसले. श्रद्धा कपूर, राजकुमार राव त्याची पत्नी पत्रलेखा, वरुण धवन, दिग्दर्शक अमर कौशिक, निर्माता दिनेश विजान आणि ईशान खट्टर आपल्या मैत्रिणींबरोबर 'स्त्री 2'च्या सक्सेस पार्टीला पोहोचला होता. 'स्त्री 2' हा पहिला बॉलिवूड हॉरर कॉमेडी चित्रपट आहे, ज्याची सर्वात मोठी ओपनिंग मिळाली आहे. दरम्यान 'स्त्री 2'बरोबर खिलाडी कुमार अक्षय कुमार, फरदीन खान, आदित्य सील, वाणी कपूर प्रज्ञा जैस्वाल आणि तापसी पन्नू स्टारर चित्रपट 'खेल खेल में' आणि जॉन अब्राहम आणि शर्वरी वाघ यांचा ॲक्शन ड्रामा चित्रपट 'वेदा' देखील बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला आहे.

'स्त्री 2'ची शनिवार व रविवारची कमाई : 'स्त्री 2' हा चित्रपट रविवारपर्यंत 150 कोटींचा आकडा सहज गाठू शकतो असा अंदाज आता व्यक्त केला जात आहे. 'स्त्री 2' चित्रपटाचं दिग्दर्शन अमर कौशिक यांनी केलं आहेत. याआधी त्यांचा आणखी एक हॉरर कॉमेडी चित्रपट 'मुंज्या' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. 'स्त्री 2' चित्रपटामध्ये यावेळी सरकटेची दहशत दाखवण्यात आली आहे. ही दहशत थांबविण्यासाठी चंदेरी गावातील लोक 'स्त्री'ची आठवण करतात. हा चित्रपट खूप मनोरंजक आहे. या चित्रपटात वरुण धवन, अक्षय कुमार आणि तमन्ना भाटिया यांनी कॅमियो केला आहे.

हेही वाचा :

  1. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2'नं बॉक्स ऑफिसवर 2 दिवसात 100 कोटींचा टप्पा केला पार - Stree 2 Box Office Collection Day 2
  2. 'स्त्री 2'नं पेड प्रिव्ह्यूमध्ये केली मोठी कमाई, पहिल्या दिवशी 'गदर 2'चा रेकॉर्ड मोडेल? - Stree 2
  3. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर स्टारर हॉरर कॉमेडी 'स्त्री 2'चं ॲडव्हान्स बुकिंग सुरू - Stree 2

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.