ETV Bharat / entertainment

स्वातंत्र्य दिनी बॉक्स ऑफिसवर होणार चार चित्रपटांची अस्तित्वासाठी लढाई - Independence Day Box Office

Independence Day Box Office : स्वातंत्र्य दिनी बॉक्स ऑफिसवर बॉलिवूडचे चार मोठे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होतील. त्यामुळे कमाईसाठीची मोठी चढओढ 'स्त्री 2', 'खेल खेल में', 'वेदा' आणि 'डबल इस्मार्ट' या चार चित्रपटामध्ये होणार आहे. यात कोण बाज मारली हे पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Independence Day Box Office
स्वातंत्र्य दिनी बॉक्स ऑफिस (Movie poster/Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 27, 2024, 6:51 PM IST

मुंबई - Independence Day Box Office : यावर्षीच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर चित्रपट रिलीज करण्यासाठी अनेक निर्माते इच्छूक होते. अखेर 15 ऑगस्ट रोजी 'स्त्री 2', 'खेल खेल में', 'वेदा' आणि 'डबल इस्मार्ट' हे चार चित्रपट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. बॉक्स ऑफिसवर यापैकी कोणी बाजी मारतंय हे पाहणं रंजक असणार आहे.

'स्त्री 2'

15 ऑगस्टला रिलीज होणाऱ्यांमध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेल्या 'स्त्री' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाचा सीक्वल सर्वाधिक चर्चेत आहे. अलीकडेच 'स्त्री 2' चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर चित्रपटाभोवतीच्या चर्चा वाढल्या आहेत. कथेबद्दलची उत्सुकता ताणल्यामुळे याचा फायदा चित्रपटाला होऊ शकतो. 'स्त्री'च्या पहिल्या भागाच्या शेवटी श्रद्धानं चंदेरी गाव सोडल्याचं दाखवण्यात आलं होतं. चंदेरी हे गाव 'स्त्री'पासून मुक्त झालं असताना हा 'सरकटा' हा नवा राक्षस पुरुष आता गावात फिरतो आहे आणि स्त्रियांना पळवून नेतो आहे. पुन्हा एकदा गावकरी मदतीसाठी राजकुमार आणि त्याच्या टोळीकडे वळतात. श्रध्दा राक्षसाशी लढण्यासाठी परत येते. भय आणि हास्यरसाचा भरपूर वापर यात करण्यात आल्यानं चित्रपटाला हुकमी यश मिळेल असा निर्मात्यांचा अंदाज आहे.

श्रद्धा आणि राजकुमार व्यतिरिक्त या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी, अपारशक्ती खुराना आणि इतर कलाकार यांच्या 'स्त्री 2' मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. अमर कौशिक दिग्दर्शित हा चित्रपट या स्वातंत्र्यदिनी, 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'खेल खेल में'

'खेल खेल में' हा दुसरा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. अलीकडेच या चित्रपटातील हौली हौली' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्याला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आहे. 'खेल खेल में' या चित्रपटामध्ये कॉमेडी आणि रोमांन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता अक्षयला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

'खेल खेल में' या चित्रपटाचं दिग्दर्शन मुदस्सर अझीझ यांनी केलंय. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, विपुल डी शाह, अश्विन वर्दे, राजेश बहल, शशिकांत सिन्हा आणि अजय राय यांनी केली आहेत. 'खेल खेलमें'मध्ये अक्षय कुमार, वाणी कपूर, तापसी पन्नू व्यतिरिक्त पंजाबी अभिनेता एमी विर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.

जॉन अब्राहम स्टारर 'वेदा'

बॉलिवूडचा 'हँडसम हंक' जॉन अब्राहम पुन्हा एकदा अ‍ॅक्शन अवतारात दिसणार आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये जॉन शाहरुख खान स्टारर अ‍ॅक्शन चित्रपट 'पठाण'मध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. आता जॉन अब्राहम, तमन्ना भाटिया आणि शर्वरी वाघ अभिनीत 'वेदा' नावाच्या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठी अपेक्षा आहे. त्यामुळेच सलग सुट्ट्यांचा विचार करुन 15 ऑगस्ट रोजी हा चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. असं असलं तरी चित्रपटाला अद्याप सेन्सॉरकडून सर्टिफिकेट मिळाले नसल्यामुळे निर्माते चिंतेत आहेत. सर्व कागदपत्रांची पूर्तता करुनही सेन्सॉर विलंब करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सर्व काही सुरळीत पार पडेल आणि बॉक्स ऑफिसवर धमाका करण्यात जॉन अब्रहामचा 'वेदा' यशस्वी होईल अशी अटकळ निर्मात्यांनी बांधली आहे.

'डबल इस्मार्ट'

यंदाच्या स्वातंत्र्य दिनाला रिलीज होणाऱ्या चौथ्या महत्त्वाच्या चित्रपटाचं शीर्षक आहे 'डबल इस्मार्ट'. संजय दत्तची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट दाक्षिणात्य भाषामध्ये बनत असून हिंदीतही याचं रिलीज आहे. संजय दत्त हळुहळु साऊथ सिनेसृष्टीत आपला पाय रोवत आहे. 'केजीएफ' या ब्लॉकबस्टर चित्रपटानंतर संजय दत्तला एकामागून एक साऊथ चित्रपटांच्या ऑफर येत आहेत. यापैकीच 'डबल इस्मार्ट' हा महात्वाचा चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेते पुरी जगन्नाध हे करत आहेत. या चित्रपटात साऊथ अभिनेता राम पोथीनेनी हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 'स्मार्ट शंकर'चा सीक्वल असून या चित्रपटात संजय दत्त 'बिग बुल' खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. 15 ऑगस्ट रोजी तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये 'डबल इस्मार्ट' रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.