मुंबई Stree 2 Day 12 Collection: 'स्त्री 2' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या चित्रपटानं रुपेरी पडद्यावर तब्बल 12 दिवस पूर्ण केले आहेत. या चित्रपटानं 11 दिवसातच बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'स्त्री 2'नं अनेक चित्रपटांचं रेकॉर्ड मोडीत काढलं आहे. 400 कोटींचा टप्पा पार करणाऱ्या सर्वात जलद चित्रपटांच्या यादीत 'स्त्री 2' चौथ्या क्रमांकावर आहे. हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई करणारा 7वा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटानं 12व्या दिवसाच्या कमाईत 'केजीएफ 2'चा हिंदी कमाईचा विक्रम मोडला आहे. 'स्त्री 2' या चित्रपटानं 12 व्या दिवशी किती कमाई केली याबद्दल जाणून घेऊया.
'स्त्री 2' 12 व्या दिवसाचं कलेक्शन : 'स्त्री 2'च्या कमाईचे अधिकृत आकडे समोर आले आहेत. या चित्रपटानं जगभरात एकूण 589 कोटी रुपये कमावले आहेत. देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 'स्त्री 2'चं एकूण कलेक्शन 498 कोटी रुपये आणि निव्वळ कलेक्शन 422 कोटी रुपये झालं आहे. 'स्त्री 2'चं ओव्हरसीज ग्रॉस बॉक्स ऑफिस कलेक्शन 91 कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटानं जन्माष्टमीच्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 20.2 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
'स्त्री 2' देशांतर्गत कमाई
दिवस: 12- रुपये 20.2 कोटी. (दुसरा सोमवार)
दिवस: 11 - 40.7 कोटी. (दुसरा रविवार)
दिवस: 10 - 33.8 कोटी. (दुसरा शनिवार)
दिवस: 9 - 19.3 कोटी. (दुसरा शुक्रवार)
दिवस: 8 - 18.2 कोटी. (दुसरा गुरुवार)
दिवस: 7 - 20.4 कोटी. (बुधवार)
दिवस: 6 - 26.8 कोटी. (मंगळवार)
दिवस: 5 - 35.8 (पहिला सोमवार)
दिवस: 4 - 58.2 कोटी. (रविवार)
दिवस: 3 - 45.7 कोटी. (शनिवार)
दिवस: 2 - 35.3 कोटी. (शुक्रवार)
दिवस: 1 - 64.8 कोटी. (गुरुवार)
पहिला वीकेंड (चार दिवस) कलेक्शन – 194.6 कोटी
दुसरा वीकेंड (तीन दिवस) कलेक्शन – 93.8 कोटी
400 कोटीच्या क्लबमधील भारतीय चित्रपट (देशांतर्गत बॉक्स ऑफिस)
जवान - 643.87 कोटी.
अॅनिमल - 556 कोटी.
पठाण- 543.05 कोटी.
गदर 2- 525.45 कोटी.
बाहुबली 2- 510.99 कोटी.
केजीएफ 2- 434.70 कोटी
स्त्री 2 - 422 कोटी
स्त्री 2नं 'या' चित्रपटांना मागे टाकले
दंगल - 387.38 कोटी.
टायगर जिंदा है – 339.16 कोटी .
संजू- 342.53 कोटी.
पीके - 340.8 कोटी.
वॉर 2- 318.01 कोटी.
बजरंगी भाईजान - 320.34 कोटी.
सुलतान - 300.45 कोटी.
पद्मावत- 302.15 कोटी.
हेही वाचा :