मुंबई - Stree 2 Box Office Collection: 'स्त्री 2' आज 15 ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बुधवारी 14 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 'स्त्री 2' चित्रपटाचे सशुल्क प्रिव्ह्यू आयोजित करण्यात आला होता. 'स्त्री 2'नं सशुल्क प्रिव्ह्यूमध्ये चांगली कमाई केली आहे. याशिवाय या चित्रपटानं आगाऊ बुकिंगमध्ये 'जवान', 'पठाण 'आणि 'अॅनिमल' या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. 'स्त्री 2' हा सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर हिंदी चित्रपट 'गदर 2' च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचा विक्रम मोडून काढेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
'स्त्री 2'चं सशुल्क पूर्वावलोकन कलेक्शन : 'स्त्री 2' हा 2024 मधील सर्वात मोठा ॲडव्हान्स बुकिंग घेणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. सॅकनिल्कच्या मते, 'स्त्री 2' या चित्रपटानं 5,57,953 तिकिटे विकून 23 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आगाऊ बुकिंगच्या बाबतीत, 'स्त्री 2'नं 'जवान' (5 लाख 57 हजार), 'पठाण' (5 लाख 56 हजार), 'केजीएफ 2' (5 लाख 15 हजार), अॅनिमल' (4 लाख 56 हजार) 'वॉर' (4 लाख 10 हजार) या टॉप ॲडव्हान्स बुकिंग चित्रपटांना मागे टाकले आहे.' स्त्री 2' चित्रपटानं नॅप्ड प्रीव्ह्यूमध्ये 7.50 कोटी रुपये कमवले आहेत. 'स्त्री 2'नं सशुल्क प्रिव्ह्यू कलेक्शनमध्ये शाहरुख खानच्या 'चेन्नई एक्सप्रेस'चा (6.75 कोटी रुपये) विक्रम मोडला आहे.
'गदर 2'चा रेकॉर्ड ओपनिंगच्या दिवशी मोडेल का? : 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवसानिमित्त राष्ट्रीय सुट्टी आहे. त्यामुळे 'स्त्री 2' हा चित्रपट आज रुपेरी पडद्यावर 40 कोटींहून अधिक कमाई करणार, असा सध्या अंदाज व्यक्त केला जात आहे. हा चित्रपट चालू वर्षात हिंदीमध्ये सर्वात मोठा ओपनिंग करणारा ठरणार आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड 'फायटर' चित्रपटाच्या नावावर आहे. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी 23 कोटींची कमाई केली होती. तर 'गदर 2'नं पहिल्या दिवशी 40.10 कोटी रुपयांचे खाते उघडले होते. याशिवाय महेश बाबूच्या 'गुंटूर करम'नं भारतात 41.3 कोटी रुपयांची कमाई केली होती.
हेही वाचा :