ETV Bharat / entertainment

एसएस राजामौलीचे ओटीटी पदार्पण : 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' सिरीजचा ट्रेलर आऊट - SS Rajamoulis OTT Debut - SS RAJAMOULIS OTT DEBUT

SS Rajamoulis OTT Debut : 'बाहुबली दिग्दर्शक एसएस राजामौलीचे ओटीटीवर जोरदार पदार्पण होणार आहे. त्यांच्या 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' सिरीजचा ट्रेलर 2 मे रोजी लॉन्च झाला आहे. ही मालिका कोणत्या ओटीटीवर झळकेल हे जाणून घेण्यासाठी वाचा...

SS Rajamoulis OTT Debut
एसएस राजामौलीचे ओटीटी पदार्पण (Social media)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 2, 2024, 9:07 PM IST

मुंबई -SS Rajamoulis OTT Debut : 'आरआरआर' दिग्दर्शक एसएस राजामौली त्यांच्या अत्यंत यशस्वी 'बाहुबली' चित्रपट फ्रँचायझीवर आधारित 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' ही अ‍ॅनिमेटेड मालिका घेऊन येत आहेत. महिष्मतीच्या काल्पनिक राज्यावर आधारित बाहुबली चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अफाट यश मिळालं होतं. या तेलुगू चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळालं आहे. यात प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया यांनी भूमिका केल्या होत्या. नवीन अ‍ॅनिमेटेड प्रकल्प हा चित्रपट फ्रेंचायझीचा प्रीक्वल असेल. आज मालिकेच्या निर्मात्यांनी या प्रीक्वलचा एक अप्रतिम ट्रेलर रिलीज केला आहे.

एसएस राजामौली यांनी गुरुवारी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड'चा ट्रेलर शेअर केला आणि मालिकेच्या स्ट्रिमिंगविषयी माहिती देताना कॅप्शनमध्ये लिहिले, "महिष्मतीच्या रक्ताने लिहिलेली एक नवीन कथा. हॉटस्टार स्पेशल एस.एस राजामौलीचा बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड स्ट्रीमिंग 17 मे पासून."

या मालिकेबद्दल माहिती देताना चित्रपट निर्माता राजामौली म्हणाले, "बाहुबलीचं जग खूप मोठं आहे आणि फिल्म फ्रँचायझी हा त्याचा ठोस पुरावा आहे. तथापि, एक्सप्लोर करण्यासारखे बरेच काही आहे आणि येथेच 'बाहुबली: क्राउन ऑफ ब्लड' चित्र स्वरुपात येतो. या कथेतून बाहुबली आणि भल्लालदेव यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये पहिल्यांदाच उलगडणार आहेत. दोन्ही भावांना महिष्मतीला वाचवावे लागेल म्हणून विसरलेले एक गडद रहस्य देखील यातून उघड होईल."

या मालिकेबद्दल दिग्दर्शक खूप खूश आहे. तो म्हणाला, "बाहुबलीच्या चाहत्यांसाठी ही कथा अ‍ॅनिमेटेड स्वरूपात आणताना आम्हाला खूप आनंद होत आहे, ज्यामुळे 'बाहुबली'च्या जगात एक रोमांचक नवीन ट्विस्ट येईल. अर्का मीडियावर्क्स आणि मला शरद देवराजन, डिस्ने+हॉटस्टार आणि ग्राफिक इंडियासोबत काम करताना आनंद होत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आम्ही भारतीय अ‍ॅनिमेशनला नवा आकार देत आहोत." सध्या एसएस राजामौलीची पॉवर-पॅक अ‍ॅक्शन मालिका डिस्ने + हॉटस्टारवर या महिन्यात १७ मे रोजी प्रदर्शित होईल.

हेही वाचा -

  1. पुष्पा चक्रीवादळाचा उद्रेक होणार : करण जोहरनं 'पुष्पा पुष्पा' गाण्यातील अल्लू अर्जुनच्या अभिनयाचं केलं कौतुक - Pushpa song
  2. छोट्या मुलानं आंटी म्हटल्यावर माधुरी दीक्षितनं दिली 'ही' प्रतिक्रिया - Madhuri Dixit
  3. खळबळजनक! सलमान खान गोळीबार प्रकरणातल्या आरोपीनं लॉकअपमध्ये केली आत्महत्या, सीआयडी करणार चौकशी - Salman Khan shooting case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.