ETV Bharat / entertainment

एसएस राजामौली आणि त्याचा मुलगा जपान भूकंपातून बचावले, केली पोस्ट शेअर - SS Rajamouli - SS RAJAMOULI

SS Rajamouli : दिग्दर्शक एसएस राजामौली नुकतेच त्यांच्या 'आरआरआर' चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी जपानला गेले आहेत. आता तिथून भूकंपाची बातमी आली आहे.

SS Rajamouli
एसएस राजामौली
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 21, 2024, 2:27 PM IST

मुंबई - SS Rajamouli : चित्रपट दिग्दर्शक एसएस राजामौली जपान दौऱ्यामुळे चर्चेत आहे. राजामौली हे आपल्या कुटुंबासह 'आरआरआर'च्या स्क्रीनिंगमध्ये सहभागी होण्यासाठी जपानला गेले होते. राजामौली यांचा 'आरआरआर' चित्रपट जपानमध्ये सुरू आहे. या चित्रपटाची तेथील लोकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. जेव्हा एसएस राजामौली तेथे आरआरआरच्या स्क्रीनिंगदरम्यान हजर होते, तेव्हा तिथे अनेक लोक जमले होते. राजामौली यांनी सर्व चाहत्यांची भेट घेतली. याच दरम्यान, 21 मार्च रोजी जपानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. एसएस राजामौली आणि त्यांचा मुलगा एसएस कार्तिकेय जपानच्या भूकंपातून थोडक्यात बचावले आहेत. यानंतर तिथे गोंधळ उडाला.

जपानमध्ये झाला भूकंप : या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.3 मोजली गेली आहे. आता सोशल मीडियावर कार्तिकेयनं भूकंपाचा भीतीदायक अनुभव शेअर केला आहे. राजामौली यांच्या मुलानं त्याच्या एक्स अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची स्मार्टवॉच भूकंपाचा इशारा दाखवताना दिसत आहे. यानंतर काही वेळातच 5.3 तीव्रतेचा भूकंप झाला. कार्तिकेयनं त्याच्या या पोस्टवर लिहिलं, ''आत्ताच जपानमध्ये भूकंप झाला, मी 28व्या मजल्यावर होतो आणि हळूहळू जमीन हादरायला लागली, भूकंप झाल्याचे समजायला आम्हाला थोडा वेळ लागला, मी घाबरले होतो.'' या भूकंपामध्ये 'आरआरआर' टीम सुरक्षित आहे.

राजामौली शेअर केले होते जपान दौऱ्याचे फोटो : राजामौली यांनी जपानमधील 'आरआरआर'च्या स्क्रिनिंगचे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले होते. याशिवाय त्यांनी 83 वर्षीय जपानी महिला चाहत्यालाही भेटून कृतज्ञता व्यक्त केली होती. राजामौली यांचा चित्रपट 'आरआरआर' 25 मार्च 2022 रोजी जगभरात चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्यानं 95 व्या अकादमी पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट गाण्याचा ऑस्कर जिंकला आहे. ऑस्कर जिंकण्यापूर्वी, 'आरआरआर'मधील या गाण्यानं वेगवेगळ्या श्रेणींमध्ये एकूण 7 आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले होत. दरम्यान राजामौली यांनी त्याच्या जपान दौऱ्यादरम्यान 'आरआरआर 2' चित्रपटाची घोषणा केली आहे. यामुळे आता अनेकजण खुश आहेत.

हेही वाचा :

  1. Allu Arjun : अल्लू अर्जुननं इन्स्टाग्रामवर 25 दशलक्ष फॉलोअर्स झाल्यानंतर मानले चाहत्यांचे आभार - Allu Arjun
  2. Pulkit and Kriti Kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा लग्नानंतर मुंबईला परतले, विमानतळावर केले मिठाई वाटप
  3. Baaghi 4 : टायगर श्रॉफ स्टारर 'बागी' फ्रेंचाइजीचा चौथा भाग येणार लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.